तहसील कार्यालयात चहा पेक्षा किटली गरम

 तहसील कार्यालयात चहा पेक्षा किटली गरम,कार्यालय आवारात बसणारे दलालांची चलती



पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप 
खालापूर : ७ ऑक्टोबर,

                    शासकीय कार्यालयात सध्या नवीन पॅटर्न  तयार होत असून  तोतया कर्मचारी वावर खालापूर तहसील कार्यालयाबाहेर वाढला आहे. हे  तोतया थेट शिपायांची खुर्ची अडवून बसलेले दिसतात. विशेष म्हणजे अधिका-यानी बेल वाजवली कि  कार्यालयीन शिपाई ऐवजी हे दोघे जण हजर होत असल्याने कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्यात या दोघांविषयी भीतीयुक्त दरारा निर्माण झाला आहे. खालापूर तहसील कार्यालयाचा परिसर विशाल असा आहे. या ठिकाणी दररोज कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात असते. महसुल ,पुरवठा विभाग याशिवाय मतदार नोंदणी पासून विविध प्रकारचे दाखल्यांची काम यासाठी  नागरिकांची रीघ लागलेली असते. 
             बिन पगारी फुल अधिकारी असणाऱ्या ह्या दलालांचा वावर आणि रुबाब अधिकाऱ्यापेक्षा जास्त असून हे दलाल नक्की कोणत्या प्रकारची काम करतात याविषयी गुढ वाढत चालले आहे. हे दलाल नक्की कंत्राटी पद्धतीवर कामाला आहेत की इतर काही बाहेरची काम याबाबत एकाला छेडले असता तो गडबडून गेला. कधी शिपायाच्या खुर्ची तर कधी तहसील कर्मचाऱ्याचा खुर्चीत ठाण मांडून बसण्यापर्यंतची मजल या दोघांची गेल्यामुळे तहसील मधले कायमस्वरूपी कर्मचारी देखील दोघांना दबकून असतात.
           काहीही काम न करता या दोघांना आलेली आर्थिक सुबत्ता याचं गुपित इतर बेरोजगार तरुणांना देखील मिळाले तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी कमी होईल. कार्यालय परिसरातल्या तसेच इतर खबरी देण्याचं काम दोघेजण करीत असल्याची चर्चा असल्याने उशीर होण्या अगोदरच यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी अनेक जण करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,