प्रवीण हरिभाऊ जांभळे यांनी शक्तिप्रदर्शन करुन थेट सरपंच अर्ज दाखल

चांभार्ली मधून भारतीय जनता पक्षाचे थेट सरपंच पदाचे उमेद्वार प्रवीण हरिभाऊ जांभळे यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल 




पाताळगंगा न्यूज : दिपक जगताप 
खालापूर : २१ ऑक्टोबर,

                   तालुक्यात निवडणूकीच्या काल  शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दि खालापूर तहसील कार्यालयात आज पहायला मिळाली. २२  ग्राम पंचायत मध्ये निवडणूक होत असून ह्यापैकी खालापूर विधानसभेत १५  ग्रामपंचायत तर उरण मतदार संघात ७  ग्रामपंचायत मध्ये ५  नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
                 ह्यापैकीच प्रतिष्ठेची असलेल्या ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदाचे उमेदवार म्हणून प्रवीण हरिभाऊ जांभळे यांनी आज नामनिर्देशन अर्ज दाखल केला तर प्रभाग क्रमांक १ मधून श्रुती कुरुंगले,ज्ञानेश्वर कुरुंगले ,समृद्धी म्हात्रे ,प्रभाग २  मधून वेदिका जांभळे,सुरेखा वाघमारे, अनिता पवार, प्रभाग ३  मधून रसिका जांभळे ,बालिताई पवार तर प्रभाग क्रमांक ४  मधून प्रकाश जांभळे ,वैजयंती मुंढे,रुपेश मुंढे यांनी नामनिर्देशन अर्ज आज दाखल केले.
                    चांभार्ली ग्रामपंचायतमध्ये राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तरुण तडफदार सुशिक्षित अभ्यासू नेतृत्व असलेले प्रवीण जांभळे यांना थेट सरपंच पदाची उमेदवारी आमदार महेश बाळदी  यांनी जाहीर केल्यानंतर विरोधकाना निकलापूर्वीच झटका दिला आहे .आमदार महेश बाळदी यांच्या प्रयत्नातून चांभार्ली ग्रामपंचायतमध्ये विकास कामे झाली आहेत. ह्याचा फायदा निश्चित प्रवीण जांभळे यांना होईल असे भाकीत मतदार राजा वर्तवत आहे 
                     भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे ,अनंता जांभळे, दत्ता जांभळे, पुंडलिक जांभळे,बबन मुकादम,प्रिया मुकादम, ज्ञानेश्वर मुंढे, उमेश मुंढे विष्णू जांभळे, रामदास जांभळे, नारायण पाटील,नथु चव्हाण ,हिरामण कातकरी आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन