मतदार राजा आमच्या सोबत, दिपाली नरेश पाटील थेट सरपंच होणार
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली : २१ ऑक्टोबर
आजची तरुण वर्ग शिक्षणांच्या माध्यमातून अग्रेसर असून त्यांना राजकीय भाषा समजत असल्यांचे समोर येत आहे.निवडणूका म्हटली कि प्रत्येकांचे अस्तित्व पणाला लागते.मात्र गावाचा विकास कोण करणार? रोजगारांचा प्रश्न,नागरिकांच्या समस्या कोण मार्गी लागणार? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण होत असले तरी सुद्धा ज्या व्यक्तीने समाज्यमध्ये लोकांचे प्रश्न मार्गी लावले आहे.असे नरेश पाटील यांच्या पत्नी दिपाली नरेश पाटील हा साहजिक वारसा पुढे चालवतील असा विश्वास मतदान राजांनी व्यक्त केला असून, दिवसेंदिवस दिपाली पाटील यांचे पारडे जड होत चालले असल्यांची चर्चा निर्माण होत आहे.
८० टक्के समाजकारण आणी २० टक्के राजकारण हे तत्व मनाशी बाळगून दिपाली नरेश पाटील थेट जनतेतून सरपंच पदासाठी उभे असल्यामुळे त्यांचा विजय म्हणूजे काळ्या दगडावरील पांढरी रेषा असे समजले जाते.दगडावरील असलेली पांढरी रेषा ही सहज ओळखता येते तसा दिपाली नरेश पाटील यांच्या विजयांची रेषा दिसून येत आहे.यामुळे मतदान करणारे सर्वच तरूण वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील अनेक समस्या नरेश पाटील यांनी मार्गी लावल्या आहेत पद नसतांना सुद्धा जो व्यक्ती विकास कामे करु शकतो ? पद आल्यानंतर गावाचा विकास किती पट्टींने करु शकतो. अशी चर्चा अनेक ठिकाणी ऐकण्यास मिळत आहे.गावाचा विकास साधायचा असेल तर दिपाली नरेश पाटील हिला निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही.मतदार जागा हो आणी दिपाली पाटील निवडून आण्यासाठी एक धागा हो अशीच चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
0 Comments