प्राध्यापक प्रफुल भोसले यांची शारदा नवरात्रौत्सव मंडळाला भेट
पाताळगंगा न्यूज : संजय कदम
पनवेल : २२ ऑक्टोबर,
येथील शहराच्या मध्यवर्ती भागात माऊली प्रतिष्ठान च्या वतीने प्रथमच सार्वजनिक शारदा नवरात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक, माऊली प्रतिष्ठान चे संस्थापक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते महेशभाऊ जनार्दन पाटील, राजेश जनार्दन पाटील व रुपेश जनार्दन पाटील यांच्या निमंत्रणास मान देउन भारत राष्ट्र समिती चे पनवेल विधानसभा उप समन्वयक, व पनवेल महानगर समन्वयक, लोकप्रिय प्राध्यापक प्रफुल पंडीत भोसले सर आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी कार्यक्रमास भेट दिली.
माऊली प्रतिष्ठान चे संस्थापक महेशभाऊ पाटील यांनी प्राध्यापक भोसले यांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला, तसेच प्राध्यापक भोसले यांच्या हस्ते गरबा रासनृत्य विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी गरबा रासनृत्या साठी येणारा भक्तांचा ओघ आणि लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. पाहुण्यांच्या स्वागतासाठी वेगळा मंच, तसेच देवीसाठी वेगळे मंदिर, गरबा रासनृत्या साठी वेगळी व्यवस्था, उत्कृष्ट गरबा रासनृत्य सादर करणाऱ्या भाविकांना विविध वयोगटा प्रमाणे दररोज दिली जाणारी बक्षिसे, महिला विजेत्यांना देण्यात येणारा पैठणीचा मान हे उत्सवाचे आकर्षण राहिले आहे.
पनवेल येथे अनेक ठिकाणी नवरात्रौत्सव सुरु आहे. त्यामुळे पनवेल शहराच्या रोषणाईत भर पडली आहे. शिवाय गल्लोगल्ली, प्रत्येक रहिवासी सोसायटी मध्ये दांडिया आणि रासनृत्य सुरु आहे. उत्तम नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने सुरु असलेला कार्यक्रम पहाता माऊली प्रतिष्ठान च्या पदाधिकारी व सभासद यांची लोकप्रियता व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत दिसून येते. सर्व स्तरातुन माऊली प्रतिष्ठान चे कौतुक व प्रशंसा केली जात आहे.
0 Comments