केळवलीत रंगला खेळ पैठणीचा, पैठणीच्या विजेत्या ठरल्या पुजा जितेंद्र दिसले
पाताळगंगा न्यूज : समाधान दिसले
खालापूर : २२ ऑक्टोबर,
नवरात्र उत्सवात २१ ऑक्टोबर रोजी केळवली गावात 'होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा' या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग दर्शवला. तर सूत्रसंचालक दीपक दिसले यांनी दिलेले सर्व टास्क पूर्ण करणे अन् सोबतीला संगीताचा ठेका अशा उत्साहात ही स्पर्धा पूनम एकनाथ दिसले यांच्या आयोजनातून रंगली असता या खेळातील पैठणीच्या विजेत्या पुजा जितेंद्र दिसले ठरल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवरात्र उत्सव म्हटला की, हा उत्सव महिला वर्गासाठी उत्साह देणारा ठरत असतो. या उत्सवात महिला वर्ग नऊ दिवसात वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करत उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करीत असतात. तर अनेक ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करीत महिलांना प्रोत्साहन करण्यात येत असताना केळवली गावातही महिला वर्गाचा आनंद द्विगुणीत करण्याच्या उद्देशाने होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाचे २१ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते.
तर जवळपास ४५ महिला स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. उखाणे, तळ्यात - मळ्यात, संगीत खुर्ची अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला. तसेच सोबतीला संगीताचा ठेका अन् उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली असता या स्पर्धेच्या विजेत्या ठरलेल्या पुजा जितेंद्र दिसले यांना "पैठणी" देऊन गौरव करण्यात आला.
0 Comments