माजगांव - आंबिवली चे नरेश पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 अजित पवार गट राष्ट्रवादीला खिंडार ,राष्ट्रवादीचे जिल्हा युवक चिटणीस नरेश पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश



पाताळगंगा न्यूज : समाधान दिसले
खालापूर : १० ऑक्टोबर,

             खालापूर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमिंग सुरु असल्याने अनेक राजकीय नेते मंडळी - विवीध कार्यकर्ते प्रभावित होत असताना अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हा युवक चिटणीस नरेश पाटील व राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते किशोर पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहिर पक्ष जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांच्या उपस्थितीत तसेच संपर्कप्रमुख आत्माराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याने अजित पवार गट राष्ट्रवादीला खालापूर तालुक्यात खिंडार पडल्याने शिवसैनिकांन मध्ये उत्साह संचारले आहे. तर हा पक्ष प्रवेश सोहळा पाताळगंगा येथील सिद्धेश्वरी कॉर्नर मधील शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडले
                   याप्रसंगी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, संपर्कप्रमुख आत्माराम पाटील, युवासेना उपजिल्हा आधिकारी निखिल पाटील, माजी उपसभापती रमेश पाटील, विभागप्रमुख दीपक देशमुख, उपतालुका संघटक सुधिर पाटील, संपर्कप्रमुख तुकाराम गायकवाड, विभाग प्रमुख राजेश ढवाळकर, युवासेना उपतालुका अधिकारी मंगेश पाटील, 
          युवासेना विभाग अधिकारी समीर काठावले, माजी सरपंच सावले शिवाजी माळी माजी सरपंच वडगाव भगवान पाटील, माजी सरपंच माजगाव राजेश पाटील, उपसरपंच जाभीवली अशोक कोडीलकर, माजी उपसरपंच दत्ता खाने, जेष्ठ नेते उत्तम भोईर, युवासेना संघटक अंकुर बामणे, सुनील पाटील, रमेश ढवाळकर, रवी पाटील, रोहित बामणे, माजी उपसरपंच आंनता लबडे, बबन शिंदे, मारुती ढवाळकर, शाखाप्रमुख मंगेश महाब्दि, उपशाखाप्रमुख चंद्रकांत जाधव, 
                  रामदास काठावळे, अतुल लबडे, यूवती सेना तालुका आधिकारी भारती लोते, महीला शाखा आधिकारी कृपाली पाटील आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. तर जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीचे जिल्हा युवक चिटणीस नरेश पाटील व राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते किशोर पाटील याच्या समवेत प्रदिप पाटील, प्रविण पाटील, राजू पाटील, राहुल पाटील, दिपाली पाटील, नीलीमा पाटील, राज पाटील, किसन पाटील, नामदेव पाटील, भारती पाटील, पल्लवी पाटील, अलका पाटील, यशवंत पाटील, संजय पाटील, कुमुद पाटील व आदिवासी समाजातील चंद्रकांत जाधव, बाळाराम पवार, अजय वाघे, सागर वाघे, विजय वाघे, सागर पवार, प्रल्हाद वाघे, नितीन वाघे, करण वाघे यांच्यासह असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.
               तर शिवसेना पक्षात दोन गट पडल्यानंतर बहुतांशी नागरिकांनी व शिवसैनिकांनी उद्धव साहेब ठाकरे यांचे समर्थन देत पाठिंबा दिला असता अनेक राजकीय पक्षातील नेते मंडळी ही शिवसेना पक्षावर प्रभावी होत असल्याचे पाहायला मिळत असून खालापूर तालुक्यातील शिवसेनेला उभारी मिळत असताना खालापुर तालुक्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज युवा नेते तथा राष्ट्रवादीचे जिल्हा युवक चिटणीस नरेश पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडल्याने शिवसेनेमध्ये उत्साह संचारला आहे. तर या पक्षप्रवेशाने खालापुर तालुक्यातील शिवसेनेचा गड पुढील काळात अधिक मजबूत असल्याने शिवसैनिक आनंद व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments

स्वच्छता विषयी पथनाट्य,राजिप शाळा वडगांव यांचा स्तुत्य उपक्रम