पातळगंगा न्यूज वृत्तसेवा
३० मार्च ,
शरद कला क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा सन २०२३ चा आदर्श कार्यंकर्तां हा पुरस्कार रसायनी येथील पत्रकार राकेश काशिनाथ खराडे यांना पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.तर याचवेळी सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष पद्मभूषण प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा व युवा गायक जावेद अली यांना स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, धारिवाल इंडस्ट्रिजचे एम. डी. प्रकाश धारिवाल, सुहाना-प्रविण मसालेवाले उद्योगाचे एम. डी. विशाल चोरडिया, जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राकेश सांकला यांच्यासह प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड व्यासपीठावर होते.
प्रत्येकी एक लाख रुपये, शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि स्व. राम कदम परिधान करीत अशी फरची टोपी असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदाचे 14 वे वर्ष आहे.यावेळी संस्थेच्या 25 वर्षांच्या वाटचालीचे छायाचित्रांच्या माध्यमातून केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्याहस्ते झाले. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या हजारो कार्यकर्त्यांतील दोघा पदाधिका-यांना देण्यात आला.आदर्श कार्यकर्ता पुरस्कार महाराष्ट्रातून विरेंद्र लाटकर (नागपूर) आणि राकेश खराडे (रसायनी-पनवेल) यांना याप्रसंगी प्रदान करण्यात आला.
शरद पवार यांची कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करणारी चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. प्रतिष्ठानच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, प्रसिद्ध गायक शंकर महादेव आणि प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी पुरस्कार प्राप्त अनुप जलोटा आणि जावेद अली यांना चित्रफितीद्वारे शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त राम कदम यांनी संगीत दिलेली गीते नंदेश उमप, संदीप उबाळे, श्रद्धा जोशी,दुरदर्शंनवर गाजणा-या सावनी सावकर यांनी गायलेल्या महाराष्ट्र गीताला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.तर भजन सम्राट अनुप जलोटा 'राम नाम मिठा है,कोई गाके देखले 'या भजनाद्वारे रसिकांची इच्छा पूर्ण केली.तसेच प्रसिद्ध युवा गायक 'शुर आम्ही सरदार 'या मराठी गीताने प्रेक्षकांमध्ये विरश्री चेतविली.तर 'श्रीवल्ली 'या गीताद्वारे ताल धरायला उद्युक्त केले.रसायनीतील पत्रकार राकेश खराडे यांना शरद कला क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा आदर्श कार्यंकर्तां पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांच्याकडे शरद कला क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची रायगड जिल्हा सचिव म्हणून जबाबदारी आहे.
0 Comments