प्राथमिक आरोग्य केंद्र लोहप येथे,आरोग्य आहार विषयी रेसिपी प्रदर्शन,
परिचारिका प्रशिक्षक,जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग यांचा पुढाकार
डॉ.प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी,डॉ. मंगेश देशमुख, यांचे मोलाचे मार्गदर्शन
माय मराठी न्युज: वृत्तसेवा
लोहप : 28 नोव्हेंबर,
प्राथमिक आरोग्य केंद्र सातत्याने अनेक उपक्रम घेत असल्यामुळे, प्रत्येकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आहार विषयी प्रशिक्षक व मार्गदर्शन जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलींनी तेवीस प्रकाराच्या रेसिपी या ठिकाणी प्रदर्शनास ठेवण्यात आले होते. घरच्या घरी आणि जलद गतीने होत असलेल्या ह्या रेसिपी आरोग्य उत्तम राखण्यास मदत होत असते.असे प्रदर्शनास ठेवण्यात आलेल्या तसेच त्यांचे लाभ कोणास तसेच हे नुकसान होते यांचे सर्व विश्लेषण करून सांगत होते.
आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येक जण बाहेरील पदार्थ यांची मागणी करीत असतो. मात्र बाहेरील अन्न सातत्याने आपल्या शरीरासाठी योग्य नसते.तसेच डॉक्टर सुद्धा घरचे ताजे अन्न खाण्याचा सल्ला देत असतात.परिणामी बाहेरील अन्न आपल्यासाठी हानिकारक असते.यामुळे घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण उत्तम काही बनवू शकतो.यासाठी हे प्रदर्शन आयोजन करण्यात आले. यावेळी गरदोर पणा चा आहार,वयोवृद्ध,तसेच लहान मुलांचे आहार, तसेच आजारी व्यक्ती विषयी सख्योल मार्गदर्शन प्रत्येकांना देण्यास येत होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी,डॉ. मंगेश देशमुख,जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग - सेविका गायत्री म्हात्रे, परिचर्या अधिकारी प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय अलिबाग - सारिका पाटील, परिचर्या पाठ्यनिर्देशिका प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय अलिबाग स्वाती मोरे, नोजेमोद्दीनं काझी, आरोग्य सहायिका मीना खरात, फार्मसी ऑफिसर - सोनाली गाढे,लॅब ऑफिसर समीक्षक पाखरे आदि च्या उपस्थिती ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी या परिसरातील ग्रामस्थ तथा रुग्णांनी सहभाग घेवून आरोग्य विषयी आहार विषयी माहिती अकलन केली.




0 Comments