पं.स.चे माजी सदस्य उत्तम परबळकर यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

 पं.स.चे माजी सदस्य उत्तम परबळकर यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर : १० ऑक्टोबर,

         हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होत तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हा संघटकपदी खालापूर पंचायत समितीचे माजी सदस्य उत्तम परबळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून उपजिल्हा संघटकपदी उत्तम परबळकर यांची निवड होताच सर्व स्तरातून उत्तम परबळकर अभिनंदनचा वर्षाव यांच्यावर होत आहे. तर या निवडीचे नियुक्तीपत्र आमदार महेंद्रशेठ थोरवे व जिल्हाप्रमुख संतोषशेठ भोईर यांच्या हस्ते देण्यात आले.
                 यावेळी आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, संपर्कप्रमुख विजय पाटील, ज्येष्ठ नेते शिवराम बदे, संजय देशमुख, विधानसभा प्रवक्ते अमोल पाटील, तालुकाप्रमुख संदेश पाटील, खालापूर युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे आदि प्रमुखांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
               महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या सत्तांतरांचे पडसाद कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातही पडले असता या मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे यांचे समर्थन केले असता कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य शिवसैनिकांनी आमदार थोरवेंच्या या निर्णयाला पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केला असता यामध्ये खालापुर पंचायत समितीचे माजी सदस्य उत्तम परबळकर यांनी ही आमदार थोरवे यांना समर्थन देत पाठिंबा दिला. 
            तर शिवसेनेतील फुटी नंतर आमदार थोरवेच्या पाठीशी ठाम राहणाऱ्या उत्तम परबळकर यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर नुकतीच उपजिल्हा संघटक पदाची धुरा देण्यात आली आहे. तर या आशयाचे नियुक्तीपत्र आमदार थोरवे यांनी उत्तम परबळकर दिल्याने परबळकर यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे.
            खालापुर पंचायत समितीचे सदस्य पदी निवडून आल्यानंतर उत्तम परबळकर यांनी खालापूर तालुक्यातील खेडेपाडावर जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने त्यांच्या प्रति समाजात आदर युक्त भावना आहे. तर त्यांच्या याच सामाजिक कार्याची व राजकीय वाटचालीची दखल घेत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी त्यांच्यावर शिवसेना उपजिल्हा संघटक पदाची धुरा दिली आहे. तर उत्तम परबळकर यांना मिळालेली संधी भविष्यात शिवसेनेला उभारणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत असून उत्तम परबळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments

स्वच्छता विषयी पथनाट्य,राजिप शाळा वडगांव यांचा स्तुत्य उपक्रम