कृष्णा भोसले : प्रतिनिधी
तळा : २९ मार्च,
विजेचा वाढता वापर आणी विज बीलामुळे प्रत्येक सामान्य नागरिक घर सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मात्र सौर उर्जेचा वापर करून आपण आपल्या घरात प्रकाश निर्माण करु शकतो या संकल्पनेतून ग्राम पंचायत काकडशेत यांनी दिव्यांगासाठी सौर कंदील वाटप करण्यात आले. विजेची कपात होवून विज अल्प प्रमाणात येण्यास मदत होइल त्यांच्या बरोबर १५ वा वित्त आयोग व ग्रामनिधी मधून त्यांच्या खात्यात आर्थिक मदत देण्यात आली.
सरपंच हर्षदा तापकीर,ग्रामसेवक उमाजी माडेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आले.यासाठी ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी सव्वीस दिव्यांगानी या योजनेचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानांचे हास्य पाहावयास मिळाले.ग्रामपंचायत वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे यामुळे अनेकांना त्यांचा लाभ मिळत आहे.
यावेळी ग्रा.पं सदस्य मंगेश काप, सदस्या वंदना केळकर, प्राजक्ता राऊत, समिक्षा सपकाळ, लक्ष्मी दिवेकर, भारती साळवी आणि
काकडशेत माजी अध्यक्ष अंकुश राऊत अपंग लाभार्थी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामुळे या दिव्यांग बंधू भगिनी यांचे चेहरयावरील हसु फुललेले दिसुन येत होते.
0 Comments