वडवल, मुळगाव येथील आदिवासी बांधवांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप
खालापूर : ११ ऑक्टोबर,
भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पनवेल येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पनवेल चे आमदार प्रशांतदादा ठाकूर व विंक्रात पाटील प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत पनवेल येथे खालापूर तालुक्यातील असलेल्या वडवल, मुळगाव येथील आदिवासी बांधवांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
ह्या वेळी भगवान नावजी वाघमारे माजी सरपंच ,किसन वाघमारे,गंगूताई वाघमारे,मीनाताई वाघमारे,चंद्रकांत वाघमारे, बाळू वाघमारे, गोविंद वाघमारे, लिलाबाई वाघमारे, खंडू वाघमारे, संजय वाघमारे,सुरेश वाघमारे आदींसह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तसेच विठ्ठल मोरे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आर्यन सावंत,विश्वनाथ सावंत, राजेश मरागजे ह्यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
ह्यावेळी विकास मोरे सोशल मीडिया सहसंयोजक खालापूर तालुका,,संचिन मोरे बूथ अध्यक्ष,नितीन कदम ,अक्षय सपकाळ बूथ अध्यक्ष, सुभाष मराजगे,सागर मोरे ,निलेश मरागजे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments