निगडोली येथिल भुयारी गटारे देत आहे अपघाताला निमंत्रण, गटारावरील झाकणांची दुरावस्था

 निगडोली येथिल भुयारी गटारे देत आहे अपघाताला निमंत्रण, गटारावरील झाकणांची दुरावस्था





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
पाताळगंगा : ११ ऑक्टोबर,

                खालापूर तालुक्यातील निगडोली गावातील घरातून निघणारे सांड पाण्यासाठी भुयारी गटाराचे काम दोन वर्षापूर्वी पुर्ण झाले.घरातून निघणारे  सांड पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे या ठिकाणी वहान चालकांस खूप त्रास सहन करावा लागत होता.शिवाय वहान घसरण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यांमुळे या ठिकाणी भुयारी गटारे बांधण्यात आली.मात्र वाहनांची सातत्याने वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी बसविण्यात आलेली  लोखंडी जालीच्या झाकणांची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे अपघताला निमंत्रण मिळत आहे.
              निगडोली येथून खोपोली जाण्याचा मार्ग नजदिक असल्यामुळे या परिसरातील शेकडो नागरिक याच मार्गाचा अवलंब केला जात आहे.परिणामी या रस्त्यावर बांधण्यात आलेले  आरसीसी भुयारी गटार आता अपघातांचे केंद्र बिंदु बनत आहे.तसेच अनेक ठिकाणी लोखंडी जाली बसविण्यात आली असून मात्र वहानांच्या वर्तळामुळे यांची दुरावस्था निर्माण झाली आहे.मात्र येथिल काही तरुण वर्गांनी या ठिकाणी जाली खराब झाली म्हणून या मध्ये झाडाच्या फांद्या ठेवण्यात आल्या असून,यामुळे वहान चालकांस तातडिने निदर्शनास येताच अपघातावर नियंत्रण करणे सोपे जात आहे.
             नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी बांधण्यात आलेले  भुयारी गटारे  धोकादायक स्थितीत निर्माण झाली.यामुळे या गटाराच्या वरील तुटलेल्या जाळीचे लवकरात लवकर  काम करावे अशी मागणी येथिल ग्रामस्थ आणी वाहनचालक करीत आहे.

        कोट : 
  निगडोली येथिल भुयारी गटारे वरील असलेली झाकणांची दुरावस्था निर्माण झाल्यामुळे अपघात गंभीर स्वरूपात होवू शकतो.यामुळे या ठिकाणी तातडीने नविन झाकण बसविण्यात यावे,मात्र गेले अनेक महिने या मार्गावरून जीवघेणी प्रवास करावा लागत आहे.मात्र या ठिकाणी मोठ्या स्वरुपात अपघात होण्यांची वाट पहात आहे का ?   (राकेश पाटील - निगडोली ग्रामस्थ )

Post a Comment

0 Comments

सनी महाडिक हजारो समर्थकांसह आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल