प्रभाग क्रमांक १ मधिल पॅनल ची चर्चा, दोन्ही महिला वर्ग बहुसंख्येने निवडून येणार

 प्रभाग क्रमांक १ मधिल पॅनल ची चर्चा, दोन्ही महिला वर्ग बहुसंख्येने निवडून येणार







पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली : २१ ऑक्टोबर,

               ग्रूप ग्राम पंचायत माजगांव निवडणुकीचे वारे वाहत असतांना प्रभाग क्रमांक १ मधून वर्षा रमेश जाधव,प्रांजल प्रदीप जाधव यांनी सदस्य पदासाठी उमेद्वारी अर्ज भरले असून,हे पॅनल बहुसंख्येने निवडून येणार असल्यांची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.विशेष म्हणजे या दोन्ही पॅनल मधून सर्वसाधारण महिला वर्ग असून आज महिला वर्ग कोणत्याही बाबी मध्ये कमी नाही.तरुण वर्गांचा सध्या वाढलेले मतदान विकासाचा कडे वाटचाल करीत आहे. 
                निवडणूक म्हटली प्रत्येकांचे आयुष्य पणाला लागले जात असते.मात्र या निवडणुकांमध्ये वारे बदलले असून,महाविकास आघडीच्या माध्यमातून सदस्य समवेत थेट जनतेतून सरपंच पदासाठी उभे असलेले सरपंच बहुसंख्येने निवडून येथिल,आज तरुण वर्गांना राजकीय भाषा समजली असून आपले कोण परके कोण यांची जाणीव निर्माण होत असून सर्वच उमेद्वार यांचे पारडे जड होत असल्यामुळे निवडणुकीत धुरळा निर्माण होण्यांचे संकेत माहाविकास आघाडीच्या कार्यकर्ते यांनी दिले आहे.
                येत्या ५ तारखेला मतदान असल्यामुळे तसेच नविन मतदान असणाऱ्याची उत्सुकता वाढली आहे.निवडणुकीत उभे असलेले महाविकास आघडीच्या सर्वच उमेद्वार यांनी विजय खेचून आण्यासाठी मोर्चे बांधणी सुरु आहे.कारण सत्ता ही पाच वर्षातून एकदाच हाती मिळत असल्यामुळे तरुण वर्गांनी सुद्धा या पॅनेल टु पॅनल मतदान करण्यांचा निर्णय घेतला आहे.असे असले तरी सुद्धा मतदार राज्यावर पुर्ण विश्वास असून आम्हास बहुसंख्येने निवडून देतील या मध्ये कोणतीही शंका नाही.
                  
                

Post a Comment

0 Comments

संताच्या चरणावर  मस्तक ठेवले तर मानवी जीवन धन्य होतो. ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील