मैत्री ग्रुप आंबिवली रतीश जाधव यांच्या पुढाकाराने डे नाईट क्रिकेट सामने संपन्न,

  मैत्री ग्रुप आंबिवली रतीश जाधव यांच्या पुढाकाराने डे नाईट क्रिकेट सामने संपन्न,

प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले जीवन इलेव्हन संघ- मोरबे,

  माय मराठी न्यूज : वृत्तसेवा
आंबिवली : २४ मार्च,
     
        मैत्री ग्रुप आंबिवली आयोजित सामाजिक कार्यकर्ते रतीश बाबुराव जाधव व रुपेश ठोंबरे बिनधास्त भाई शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांच्या वतीने डे नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन आंबिवली येथिल पीपीएल कंपनीच्या समोर असलेले सोमाणी शेठ मैदान येथे  घेण्यात आले.ह्या स्पर्धेत या परिसरातील ३२  नामवंत संघानी सहभाग नोंदविला,अतितटीच्या सामन्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले जीवन इलेव्हन संघ, मोरबे,द्बितीय क्रमांक अजय इलेव्हन संघ - उसराई,देवळोली,तृतीय क्रमांक गावदेवी बी संघ - पाली, चतुर्थ क्रमांक विठ्ठल रखुमाई मंडळ संघ वडगाव यांनी पटकाविले.
                 ह्या सामन्यात अंतिम विजेत्यास प्रथम  क्रमांकास एक लाख,रुपये,द्वितीय क्रमांक पन्नास हजार तर तृतीय, चतुर्थ,क्रमांक पंचवीस हजार रुपये, व चषक देण्यांत आले.या सामन्यात अजय इलेव्हन संघ- उसरोली,देवळोली संघाचा पराभव करून जीवन इलेव्हन संघ - मोरबे यांनी प्रथम क्रमांक पटकावले.या मध्ये चार संघाना क्रमांक देण्यात आले.
           विजेत्या संघास आकर्षक चषक,देण्यांत आले.तसेच उत्कृष्ट फलंदाज -प्रथमेश राणे - मोरबे यांस सायकल व चषक देण्यांत आले.गोलंदाज - सायकल व चषक- निलेश शेळके -पाली बी,क्षेत्ररक्षक - सायकल व चषक - आयुष ठोंबरे - वडगाव,मालिकावीर बाईक व चषक
शुभम कदम - अजय इलेव्हन उसराई देवळोली यांस देण्यांत आले.
          या क्रिकेट सामन्यांचे समावोलोचन प्रकाश पाटील, अशोक मालकर,यश मालकर,सूरज हातमोडे, माणसं मनोहरे,मयूर पाटील,अभि पाटील यांनी केले.मैत्री ग्रुप आंबिवली, क्रिकेट सामने पाहण्यासाठी या परिसरातील सरपंच,उप सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा प्रेमी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.तसेच आंबिवली,माजगाव यांच्या सहकार्याने हे सामने उत्तम प्रकारे खेळले गेले.



Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज