सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव यांची प्रचार रॅलीत तोफ कडाडली,महाविकास आघाडीला पराभूत करणार...
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली : ३१ ऑक्टोबर,
ग्रूप ग्राम पंचायत माजगांव ची निवडूका रंगात येत असताना. सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव यांनी काल पौध येथे प्रचार रॅली मध्ये आपली तोफ कडाडली यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेद्वार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. या निवडणूकीत आपण त्यांचा पराभव करुन नविन वर्षांची नवि गुढी उभारणार,कारण महाविकास आघाडीमध्ये उभे असलेले ज्या उमेद्वार यांनी अनेक घोटाळे केले आहे.वेळ आल्यांस आपण पुरावे देवून सादर करुन,मात्र ते निवडणुकीत सहानुभूती दाखवून मते मागत आहे.मात्र त्यांचा डाव उधळून लावा कारण महाविकास आघाडी आपल्याला फसविल्या शिवाय राहणार नाही.
राजकारणातील हुकुमी एक्का म्हणून सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव यांच्या कडे पाहिले जाते.मात्र या निवडणूकीत त्यांस विश्वासात न घेतल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात दंड थोपाटले आहे.तुम्ही विजयांच्या गणितांची मांडणी कितीही करा. मात्र माझ्याजवळ २०० मतदान आहे.यामुळे होणाऱ्या निवडणूकीत आपणांस पराभूत केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.महाविकास आघाडी कधीही जनतेची होवू शकत नाही.कारण त्यांनी केलेले सर्व कारस्थान मी उघडे पाडल्याशिवाय शांत बसणार नाही.
मतदार राजा तुम्ही जागृत आहात त्यामुळे तुम्हाला सर्व बाबीचा आभ्यास आहे.महाविकास आघाडीला मतदान करुन आपण आपल्या पायावर दगड मारुन घेतल्यावर वेदना ही आपल्यांच होणार आहे. ज्या महाविकास आघाडीमध्ये ज्या -ज्या उमेद्वार यांनी घोटाळे केले आहेत.त्यांस निवडणूकीच्या नंतर आम्ही त्यांचा चांगला समाचार घेवू, यामुळे आपण जागृत रहा.कारण हीच वेळ आहे.की परिवर्तन घडविण्यांची , तुमच्या रॅली मध्ये असलेले सर्वच मतदार तुमचे आहे असे नाही ही तुमची भ्रामक कल्पना आहे.मतदार राजा या मध्ये आपण गुरफटून न जाता. आपण सक्षम आहात.यामुळे येत असलेल्या निवडुकीत महविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून द्या असे मत सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव यांनी आक्रमक भुमिका घेत मतदार राजांस जागृत राहण्यांचे आवाहन करण्यात आले.
0 Comments