प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सावरोली ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटला
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
सावरोली : ३१ ऑक्टोबर,
निवडणूक आयोगाने महराष्ट्रात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील असणाऱ्या ग्रामपंचायतिच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून मतदान ५ नोव्हेंबर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबर रोजी असणार आहे.त्यामुळे निवडणूकीसाठी लागणारी सर्व प्रकिया पूर्ण केल्यावर उमेदवारानी आपला मोर्चा प्रचाराकडे वळवला आहे आठवड्या भरावर निवडणूक आल्यामुळे वेळेचं बंधन असणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा मतदार संघातील आपल्या प्रभागात वळवला आहे मतदारांना भेटणं ,प्रचार करणं या सारख्या गोष्टीवर उमेदवार भर देताना दिसून येत आहे.
खालापूर तालुक्यातील होऊ घातलेल्या २२ ग्रामपंचायतीच्या निवडणूकी पैकी प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सावरोली ग्रामपंचायत मध्ये पण प्रचार कार्यक्रम चालू झाला असून सरपंच पदाचे युवा उमेदवार संतोष बैलमारे यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सावरोली येथील श्री भैरवनाथ मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,मनसे,काँग्रेस या पक्षाच्या ग्रामविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटला असून या
ग्रामविकास आघाडी कडून
थेट सरपंच पदासाठी उमेदवार - संतोष गणेश बैलमारे
तर प्रभाग 1 मधून
रंजना नांदकुमार पाटील
शुभम चंद्रकांत किलंजे
प्रभाग 2 मधून
प्रशांत किसन गोपाळे ,
प्राची प्रदीप लाड,
आराधना नागेश मेहत्तर
तर प्रभाग 3 मधून
विवेक गजानन पाडगे,
ममता संदीप घोसाळकर,
अश्विनी विशाल चोगले
व प्रभाग 4
समाधान गणेश बैलमारे,
उज्वला किशोर बैलमारे
व मनाली कुशल दर्गे
हे ग्रामपंचायत मध्ये आपलं नशीब आजमावत असून निवडून आल्यावर सर्वात प्रथम स्थानिक मुलांना टाटा स्टील कंपनी नोकरीवर कायम करून घेऊ असे आश्वासन सरपंच पदाचे उमेदवार संतोष बैलमारे यांनी सदस्य पदासाठी उभे असलेल्या 11 उमेदवाराच्या वतीने यावेळी दिले असून यावेळी सावरोली ग्रामविकास आघाडी निवडणूक प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसून आले.
0 Comments