महाविकास आघाडीच्या प्रचारांच्या तिसऱ्या दिवसातही मतदार राजाचा उत्तम प्रतिसाद,थेट सरपंच सह सर्वच उमेद्वार निवडून येणार मतदार राजांनी दिला कौल
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
सावरोली : ३१ ऑक्टोबर,
ग्राम पंचायत सावरोली निवडणूकीच्या तिसऱ्या दिवशी ही या गावामध्ये असलेले गणेश मंदिर यांचे दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात करण्यात आली. थेट जनतेतून सरपंच या पदासाठी उभे असलेले संतोष गणेश बैलमारे यांना मतदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गावात निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी,आणी जनतेची सेवा करण्यांस मिळावी या उद्दात विचारांतून ८० टक्के समाजकारण आणी २० टक्के राजकारण हे तत्व मनाशी बाळगून थेट सरपंच उभे असलेले संतोष बैलमारे तसेच त्यांच्या समवेत उभे असलेले सर्व सदस्य बहुमतांने निवडून येथिल या मध्ये कोणतीही शंका नाही.
सावरोली ग्राम पंचायत ची निवडणूका मोठी अस्मितेची मानली जात.या प्रत्येक सदस्य तसेच थेट सरपंच यांनी सर्वस्व पणाला लावले आहे.मात्र निवडणूकीत मतदार राजंचे प्रेम सातत्याने मिळत असल्यामुळे या निवडणूकीत भरघोष मते आपल्याला मिळणार आपण महाविकास आघाडीतून उभे असतांना जिथे विकास तेथे मतदान हे समीकरण आता बदलत चालले आहे.गावातील समस्या निर्माण झाल्यांस त्या मार्गी लावून गावात विकास गंगा निर्माण करण्यांचे स्वप्न हाती घेतले आहे. त्याच बरोबर रोजगार हा विषय ही मोठ्या चिंतेचा असून सर्वांच्या हाताला काम हेच धोरण आमचे काम असे तत्व महाविकास आघाडी स्विकारत आहे.
माहाविकास आघाडी म्हणजे सर्व सामन्य तरुणवर्गामध्ये एकत्र राहून तरुणांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेच त्या बरोबर एकमेकांच्या सुख - दुखात सहभागी होत आहे.आज प्रचार रॅली च्या तिसऱ्या दिवशी आशिष पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आला निवडणूकीची रणधुमाळी सुरु असतांना हा वाढदिवस साजरा होत असल्यामुळे पवार यांच्या चेहऱ्यावर समाधानांचे हास्य पहावयास मिळाले
यावेळी थेट जनतेतून उभे असलेले सरपंच संतोष गणेश बैलमारे तसेच सदस्य
प्रभाग क्रमांक १ रंजना नंदकुमार पाटील ,शुभम चंद्रकांत किलंजे,प्रभाग 2 मधून प्रशांत किसन गोपाळे, ,प्राची प्रदीप लाड,आराधना नागेश मेहत्तर तर प्रभाग 3 मधून विवेक गजानन पाडगे,ममता संदीप घोसाळकर,अश्विनी विशाल चोगले,व प्रभाग 4, समाधान गणेश बैलमारे,उज्वला किशोर बैलमारे व मनाली कुशल दर्गे अदि सदस्य सह सरपंच निवडणूकीच्या रिंगणात उभे आहे.
0 Comments