मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर अंबुलन्सचा स्फोट, व्हेंटिलेटर न मिळाल्याने रुग्ण महिलेचा मृत्यू ....

 मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर अंबुलन्सचा स्फोट, व्हेंटिलेटर न  मिळाल्याने रुग्ण महिलेचा मृत्यू ....



पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : ३१ ऑक्टोबर,

            मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर एका अंबुलन्सला अचानक आग लागून स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, या अपघातात अंबुलन्स मधील रुग्ण महिलेचा व्हेंटिलेटरवर न मिळाल्याने  मृत्यू झाला आहे, 
                   मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून अंबुलन्स पेसेंटला घेऊन गुलबर्गा (कर्नाटक )  येथे जात असताना ती बोरघाटात आली असता एक्सप्रेस वेवर   अचानक बंद पडली, त्या अंबुलन्स मधील असलेले   रुग्ण महिला  आणि त्यांचे नातेवाईक तात्काळ गाडीतून खाली उतरल्यानंतर   काही काळाने अंबुलन्सला भीषण आग लागली ही आग एवढी भीषण होती की या आगीत  अंबुलन्सचा मोठा स्फोट होऊन भीषण अपघात झाला मात्र या अंबुलन्स मधील रुग्ण महिला ही अत्यवस्थ असल्याने ती व्हेंटिलेटरवर होती, मात्र अंबुलन्स मधून रुग्ण  महिलेला खाली उतरल्याने तिला दुसरा व्हेंटिलेटरवर मिळाला नसल्याने  रुग्ण महिला ( निलववा कवलदार )हिचा  मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, 
  या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, खालापूर पोलीस, बोरघाट पोलीस, अपघात ग्रस्तटीमचे सदस्य देवदूत यंत्रणा, अग्निशमन दल , आयआरबी पेट्रोलिंग, महाराष्ट्र सुरक्षा बल ,लोकमान्य अंबुलन्स  सेवा, तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीने पर्यन्त केले, यामुळे काही काळ एक्सप्रेसवेची वाहतूक रोखण्यात आली होती, मात्र या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यांचे दुचाकी जळून खाक झाली, 
              यावेळी बोरघाटात पोलीस चौकीचे  एपीआय योगेश भोसले आणि कर्मचारी, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत, एपीआय हरेश काळसेकर, आणि कर्मचारी अपघातातग्रस्तटीमचे गुरुनाथ साठीलकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर