पुरातन समाधी भोवताली स्वच्छता, महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून आगळावेगळा संदेश...
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : २ ऑक्टोबर,
खोपोली शहरातील वीरेश्वर मंदिर हे एक प्राचीन व ऐतिहासिक मंदीर आहे.या मंदिराच्या विरुद्ध बाजूला खोपोली एच.पी.गॅससमोर एक समाधी अनेक वर्षापासून जीर्ण अवस्थेत आहे .या समाधीकडे पाहता ही ऐतिहासिक काळामधील समाधी आहे असे प्रथमदर्शनी निदर्शनात येते परंतु या ठिकाणी असणारा कचरा साफ करण्यासाठी आपच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले.या ऐतिहासिक वास्तूचा शोध लावण्यासाठी आपचे शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत.
2 ऑक्टोबर 2023 रोजी आपच्या माध्यमातून सदर समाधी भोवतालची जागा स्वच्छ करण्यात आली.पाण्याने धुवून त्याठिकाणी रांगोळी काढण्यात आली.हार,फुले वाहण्यात येवून दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी कविता खरे व सोनी यादव यांच्या माध्यामातून स्वच्छता मोहीम पार पडली.यावेळी आपचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,दिपक कांबळे, शिवा शीवचरण,विवेक वाघमारे,धर्मेंद्र चव्हाण, मैनुद्दीन बागवान,गौरी येरुनकर ,रमेश मिस्त्री, भगवान पवार,शाकीर शेख,रमेश म्हेत्रे,सचिन शिवचरण,पुजा मोरे,चंद्रप्रकाश उपाध्याय,आराधना चौधरी,धनवंती नागर,बबिता नागर, शर्मा यांनी या उपक्रमात हिरीरीने भाग घेतला.
यावेळी शांतीनगर येथील सोनी चौरसिया,वासरंग येथील शीतल पोलसुरे,परवीन शेख यांनी आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश केला.आता ऐतिहासिक वास्तूचा शोध लावण्यासाठी शासन दरबारी आप प्रयत्न करणार आहे.या आगळ्यावेगळ्या मोहिमेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आप चे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी आभार मानले आहेत.
0 Comments