धावपळीच्या युगात आरोग्याची काळजी घ्या- गणेश कडू

 धावपळीच्या युगात आरोग्याची काळजी घ्या- गणेश कडू,सानवी न्यूट्रिशन अँड मसाज थेरपी सेंटरचे उद्घाटन ...




पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : २४ ऑक्टोबर,

             आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगराचे सरचिटणीस व माजी नगरसेवक गणेश कडू यांनी केले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पनवेल शहरातील 360 फिटनेस झोनच्या सानवी न्यूट्रिशन अँड मेल मसाज थेरपी सेंटरचे उद्घाटन गणेश कडू यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले.
                     याप्रसंगी जिम ओनर सुदेश संजीवन देवघरकर, जिम ट्रेनर जतिन वानखडे,जिम ट्रेनर प्रतीक कदम,जिम रिसेप्शनिस्ट कावेरी कांबळे,जिमचे रवी मामा,मसाज तज्ञ अनिल बर्मा,उन्नती हॉस्पिटलचे डॉ.समाधान पाटील भाटिया विद्यालयातील शिक्षक सचिन आंग्रे,आयटी पार्क सुधीर पांचाळ,क्राईम ब्रांच ऑफिसर रणजीत पाटील, शिल्पा गणेश कडू,नेहा सुरेश देवघरकर,जनिमा नेओमी आदी उपस्थित होते.
             आपल्या शरीराची काळजी ही आपण घेतली पाहिजे.आज लहान मुलांना सुद्धा हृदय विकाराचा त्रास होत आहे. शरीर फिट ठेवण्यासाठी आज फिटनेस झोनची गरज असल्याचे माजी नगरसेवक गणेश कडू यांनी सांगितले. यावेळीअद्यावतपणे उभारण्यात आलेल्या 360 फिटनेस झोनची गणेश कडू यांनी पहाणी केली. मान्यवरांचे स्वागत जिम ओनर सुदेश संजीवन यांनी केले.

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार