खोपोलीत सहज सेवा फाऊंडेशनच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान..

 खोपोलीत सहज सेवा फाऊंडेशनच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान..नवरात्री निमित्ताने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा घरी जावून सन्मान...



पाताळगंगा न्यूज : शेखर जांभळे 
खोपोली : २४ ऑक्टोबर,

                सहज सेवा फाऊंडेशन ही समाजात नेहमीच निरनिराळे उपक्रम राबवित असते.सातत्यपूर्ण उपक्रम ही संस्थेची ओळख ठरलेली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे सलग पाच वर्षांपासून दाखल असलेल्या रुग्णांसाठी दोन वेळचे निःशुल्क जेवण,खोपोली हद्दीत मयत झालेल्या रुग्णांसाठी निःशुल्क स्वर्ग रथसेवा, शव पेटी,रुग्णांसाठी अल्प काळासाठी हवी असणारी वैद्यकीय उपकरणे तसेच विविध शाळांमध्ये लैंगिक शिक्षण,सायबर क्राईम मार्गदर्शन,आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा,झाडाखालील निसर्ग शाळा हे संस्थेचे उपक्रम समाजास उपयोगी ठरत आहेत.
           

  शारदीय नवरात्रौत्सव सणाचे औचित्य साधून समाजाच्या जडणघडणीत मोलाचे कार्य करणाऱ्या दुर्गांचा सहज सेवा फाऊंडेशन  तर्फे सन्मान करण्यात आला.नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवशी पर्यंत दररोज कर्तृत्ववान महिलांचा  राहत्या घरी  सन्मान करण्यात आला.याचसोबत खोपोली नगरपरिषदेच्या महिला स्वच्छता कर्मचारी,ऑफिस स्टाफ तसेच खोपोली पोलीस स्टेशन महिला दलाचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
               खोपोली शहरातील सीमा त्रिपाठी, कल्पना पाटील, नैना खरे,भक्ती साठेलकर, शीतल गायकवाड,जयश्री साळुंखे,ॲड.मीना बाम,सुनंदा जाधव, मेहरूनीसा लोगडे,तारामती बामणे, निता कोशे,सुरेखा खेडकर,कुंदा देशमुख, शर्मिला देशमाने,संगीता फक्के,सावित्रा नायडू, मनीषा भगत,डॉ. संगीता केजरीवाल,सुवर्णा मोरे,जयमाला पाटील, क्षितिजा मरागजे,सारिका सावंत,कांचन जाधव,सई खर्डेकर,प्रतीक्षा वाघमारे,विमल कळमकर, नीती शाह,समीक्षा ढोके, अनिसा पाटील,संतोषी म्हात्रे,कुंदा दोंदे,डॉ. नलिनी रामास्वामी,दिपाली पवार, हेरॉल्ड बर्णाडीन फ्रान्सिस,शारोबी शेख, मालती परदेशी, नजमा अत्तार,उषा केळबायकर, शिल्पा मोदी,भागुबाई गोसावी, मोसम सिंग, डॉ. राबिया मुल्ला,उज्ज्वला दिघे,शुभलक्ष्मी पाटणकर यांचा सन्मान करण्यात आला.

           सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,उपाध्यक्षा इशिका शेलार,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार
संतोष गायकर,महिला संघटक निलम पाटील,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,खालापूर तालुका प्रमूख मोहन केदार,उपक्रम प्रमुख नम्रता परदेशी,मार्गदर्शक नरेंद्र हर्डीकर,विकास खुरपुडे,मनीषा नरांगळे,दिव्या मशरू,बनिता सहा
सुहास कुंभार,मिनल गायकर,तुषार अगरवाल,योगिता जांभळे,समीर साठे,सचिन साठे यांनी अथक परिश्रम घेतले .
               नवदुर्गा सन्मानाने महिलांना सन्मानित करण्याच्या सहजसेवेच्या उपक्रमामुळे नक्कीच अनेक आठवणींना उजाळा मिळून महिलांनी अधिकाधिक पुढे येवून प्रखर कार्य करावे हा मानस असल्याचे प्रतिपादन उपक्रम प्रमुख नम्रता परदेशी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार