खालापूरची ग्रामदेवता आई साबाई माता मंदिरात नवरात्र उत्सव व पालखी सोहळा उत्साहात संपन्न ...

 खालापूरची ग्रामदेवता आई साबाई माता मंदिरात नवरात्र उत्सव व पालखी सोहळा उत्साहात संपन्न ...



पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप 
खालापूर : २५ ऑक्टोबर,

                      वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार खालापूरची ग्रामदेवता आई साबाई माता मंदिरात ह्या वर्षीही नवरात्र उत्सव व साबाई मातेचा पालखी सोहळा मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे आई साबाई मातेचे मूळस्थान मुंबई पुणे हाये - लगत ढापणी गडावर असल्यामुळे दरवर्षी तसेच हनुमान जयंतीला साबाई मातेच खालापूर या गावातील ग्रामस्थ या गडावर  जावून पुजन करीत असतात.
                  नवरात्रीच्या उत्सवात  विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात केले जात असून,त्याचबरोबर नवरात्र या उत्सवामध्ये रात्री भजन त्याचबरोबर सप्तमीला रात्री बारा वाजता साबाई मातेची महाआरती केली जात असते ,व अष्टमीला मंदिरात नवचंडी होम केले करण्यात येत. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार दसऱ्याच्या दिवशी  (तहसीलदार )यांच्या हस्ते मंदिरात आपट्याची पाने रचून त्याची पूजा केली करण्यात आली.,पूजन झाल्यानंतर सोने लुटालुटीचा कार्यक्रम होत असतो.हे सोने लुटल्यांतर प्रथम ते सोन देवीला अर्पण करून नंतर एकमेकांना देवून दस-याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
             दसऱ्याच्या दिवशी रात्री संपूर्ण गावात पालखीचे जागोजागी ग्रामस्थ स्वागत करण्यात येत असून ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेत असतात.त्याच बरोबर नववधू व माहेरपणाला आलेली लेक देवीची ओटी भरूनच गावाची वेस ओलांडत असतात.नवरात्रमध्ये खालापूर गाव व पंचक्रोशीतील भाविक भक्त तसेच परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक भक्त देवीची ओटी भरण्यासाठी आई साबाई मंदिरात येत असतात.हा सोहळा साजरा करण्यासाठी संपुर्ण खालापूर शहरातील ग्रामस्थ मेहनत घेत असल्यांमुळे दरवर्षी मोठ्या उत्सवांने कार्यक्रमाचे आयोजन होत असते.

Post a Comment

0 Comments

सुकीवली जिल्हा परिषद गटातून प्रशांत आखाडे