महाविकास आघाडीतून दोन उमेद्वार बिनविरोध

महाविकास आघाडीतून दोन उमेद्वार बिनविरोध,चिन्ह वाटप,प्रचाराची रणधुमाळी,थेट सरपंच दिपाली नरेश पाटील यांच्या विजयांची चर्चा 






पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली : २६ ऑक्टोबर,

                     ग्रूप ग्राम पंचायत माजगांव थेट सरपंच तसेच सदस्य पदासाठी उभे असलेल्या सर्व उमेद्वार यांना चिन्ह वाटप झाल्यामुळे ख-या अर्थाने आज प्रचाराला सुरुवात झाली.त्याच बरोबर प्रभाग क्रमांक २ मधून शशिकांत गजानन पाटील,तसेच सरिता कमलाकर वाघे यांची प्रभाग क्रमांक २ मधून बिनविरोध निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.आपल्या मध्ये वैर निर्माण होवू नये, तसेच तसेच गावातील समस्या निर्माण झाल्यांस त्या मार्गी लावण्यांचे काम सुद्धा या महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.गावाचा विकास साधायचे असेल तर आपण एकजुटीने राहून बिनविरोध दिल्यास विकास साध्य होत असते.


              महाविकास आघाडीच्या माध्यमातून थेट सरपंच म्हणून दिपाली नरेश पाटील यांना कपबशी तसेच प्रभाग क्रमांक १ मधून वर्षा रमेश जाधव यांस छताचा पंखा,तसेच प्रांजळ प्रदिप जाधव - यांस कंगवा,तसेच मधुकर गायकवाड कपाट त्याच बरोबर त्याच बरोबर अर्पणा यशवंत शिंदे प्रभाग क्रमांक ३ मधुन छताचा पंखा म्हणून चिन्ह मिळाले आह. राजेश शिवराम पाटील प्रभाग क्रमांक ३ मधून छताचा पंखा चिन्ह मिळाले आहे. सदर महाविकास आघाडीच्या सर्व उमेद्वार यांना चिन्ह मिळाले असून प्रचारांची ख-या  अर्थाने सुरुवात झाली आहे.
                 

 महाविकास आघाडी ही गावातील निर्माण होणाऱ्या समस्या,तसेच ग्रामस्थांच्या काही अडचणी निर्माण झाल्यांस महाविकास आघाडी त्या सोडविण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे काल सर्व उमेद्वार यांना निवडणूकीचे चिन्ह मिळाले असून आज प्रचारांची रणधुमाळी सुरु आहे.

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात