आतकरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या उमेदवार शर्मिला भोईर यांची प्रचारात जोरदार आघाडी,वार्ड क्रमांक १ मध्ये वाढता पाठींबा
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : ३० ऑक्टोबर,
आतकरगाव ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक येत्या ५ नोव्हेंबरला होत असून या निवडणुकीत थेट सरपंच पदाच्या एकता परिवर्तन ग्राम विकास आघाडीचे उमेदवार शर्मिला नितीन भोईर यांची जोरदार आघाडी घेतली त्यांना मतदारांचा वाढता पाठींबा मिळत आहे,
खालापूर तालुक्यातील अतिशय प्रतिष्टेची असलेल्या आतकरगाव ग्रामपंचायतची निवडणूक होत असून या ग्रामपंचायतवर सत्ता काबीज करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी ताकद लावली आहे, यात एकता परिवर्तन ग्राम विकास आघाडीचे उमेदवार शर्मिला नितीन भोईर यांनी आज वार्ड क्रमांक १ मधील गवळीवाडा ,आणि वाघरनवाडी येथे प्रचार केला असून येथील मतदारांचा त्यांना वाढता पाठींबा त्यांना मिळत आहे,
तर वार्ड क्रमांक 2 आणि 3 मध्येही त्यांनी जोरदार प्रचार केला असून मतदारांनी त्यांना उस्फुर्त प्रतिसाद देऊन घरोघरी त्यांचे जोरदार स्वागत करीत आहेत,
0 Comments