शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रिया फ्रफुल्ल विचारे यांची प्रचारात आघाडी

 वावर्ले ग्रामपंचायत मध्ये ३५  वर्षाची विजयाची परंपरा कायम राखणार- माजी सरपंच प्रफुल्ल विचारें  तथा चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख..

 शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रिया फ्रफुल्ल विचारे यांची प्रचारात आघाडी 




पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप
खालापूर : ३० ऑक्टोबर,

            ग्रूप ग्राम पंचायत निवडणूकीमध्ये वावर्ले ग्राम पंचायत मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व राहिले असून ह्यावेळीही शिवसेना ठाकरे गटाच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार प्रिया प्रफुल्ल विचारे विजयी होतील अशी प्रतिक्रिया मतदार देत आहेत.ही निवडणूक प्रफुल विचारें यांच्या नेतृत्वाखाली होत असून राजू मोरे,प्रभाकर सावंत ,संजय धनावडे,चंद्रकांत पारठे ,बाबू दरेकर ह्यांच्या सहकार्याने वावर्ले ग्रामपंचायतवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ३५  वर्षाची विजयांची  परंपरा कायम राहणार आहे.
                ११  सदस्या पैकी ६  सदस्यांना बिनविरोध केले आहेत.वार्ड क्रमांक १ मधून नागेश होला ,मनोहर तोडकर ,वार्ड क्रमांक २  मधून सुनीता विश्वास जाधव, कल्पना भास्कर मुकणे, तर वार्ड क्रमांक ३  मधून शैला वाघमारे,सुवर्णा मोरे हे ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत तर थेट सरपंच पदाच्या उमेदवार प्रिया प्रफुल विचारें यांच्या सह सर्व सदस्य विजयी होतील असे मत माजी सरपंच तथा चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारें यांनी व्यक्त केले आहे. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर