रक्तदान आणि महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

पश्‍चिम महाराष्ट्र करंजाडे पनवेल यांच्यातर्फे आयोजित भव्य रक्तदान आणि महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद


पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : २ ऑक्टोबर,

              पश्‍चिम महाराष्ट्र करंजाडे पनवेल यांच्यातर्फे आयोेजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान आणि महाआरोेग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून जवळपास ७५ जणांनी रक्तदान केले आहे.करंजाडे ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात सदर रक्तदान आणि महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 
              यावेळी मोफत नेत्र तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, शुुगर तपासणी, हृदयाची ईजीसी तपासणी, हाडाची ग्रंथा, सीबीसी तपासणी व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला यावेळी देण्यात आला होता. यासाठी सनराईज हॉस्पिटल करंजाडे, सीमीरा डायग्नोस्टीक्स करंजाडे, तेरणा मल्टीस्पेशालिटी आणि रिसर्च सेंटर नेरुळ, साई ब्लड बँक पनवेल यांनी विशेष सहभाग घेवून नियोजन केले होते. याचा लाभ मोठ्या प्रमाणात पश्‍चिम महाराष्ट्रातील करंजाडे येथे राहत असलेल्या नागरिकांनी घेतला. 
           यासाठी डॉ.विक्रम पाटील, रामचंद्र महाडिक, ज्वालासिंग देेशमुख, सचिन गोरड, अमित कांबीरे, अजित कदम आदींनी विशेष मेहनत घेतली होती.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन