वावोशी येथे मेंढपाळ खंडू कोकरे यांच्या मेंढ्या मेल्याने ओढवले संकट .... ७ मेंढ्या आणि २ शेळ्या मेल्याने कोकरे चिंतेत ....
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे खोपोली : २३ ऑक्टोबर,
दरवर्षीप्रमाणे यंदाही मेंढपाळ आपल्या कळपातील मेंढ्या घेऊन कोकणाकडे निघाले असतांना या मेंढपाळांच्या कळपातील मेंढ्या मरू लागल्याने मेंढपाळांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे दिसून येत आहे.मेंढपाळ खंडू कोकरे हा मेंढपाळ पूणे केडगाव चौफुले या ठिकाणचा असून याने आपल्या मेंढ्यांना अन्य लोकांच्या मेंढ्या बरोबर घेऊन राखण्यासाठी पूणे जिल्ह्यातून खोपोली शहरात चार दिवसांपूर्वी प्रवेश केला.७ मेंढ्या व २ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या मेंढपाळ चिंताग्रस्त झाले आहे.
त्याच्या कळपातील चार मेंढ्या ह्या चार दिवसांपूर्वी खोपोली येथे मुक्कामाच्या ठिकाणी मरण पावल्या. मात्र या कोणत्यातरी कारणामुळे या मेंढ्या मृत्यू झाले असेल, असा समज कोकरे यांचा झाल्याने त्याने एवढे काही मनावर घेतले नाही.तेथून तो आपल्या कळपातील मेंढ्या घेऊन पुढे वावोशीकडे निघाला या दरम्यानच्या प्रवासाला त्याला तीन दिवस लागले तो काल संध्याकाळी वावोशी जवळील वनवठे येथे मुक्कामाला आला.रात्री सर्व मेंढ्या व्यवस्थित होत्या मात्र सकाळी यातील काही मेंढ्या आजारी पडल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्याने लगेच वावोशी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांशी संपर्क साधला.
डॉक्टर नेत्रा आस्वार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासणी करण्यास सुरुवात करेल पर्यंत यातील ७ मेंढ्या व २ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या.हे चित्र पाहून डॉ.नेत्रा आस्वार यांनी खालापूर तालुका पशुधन विकास अधिकारी रोहिणी गायकवाड यांच्याशी संपर्क करून तात्काळ अन्य डॉक्टरांची मदत मागवून उपचार करायला सुरुवात केली.या दरम्यान चार ते पाच मेंढ्या मृत पावल्या मात्र डॉक्टरांना ज्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले त्या मेंढ्या मात्र बचावल्याने कोकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मेंढ्या अचानकपणे एवढ्या मोठ्या संख्येने मरण पावल्याने खळबळ माजली.हे समजल्यावर खालापूर तालुका पशुधन विकास अधिकारी रोहिणी गायकवाड यांनी तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह वनवठे येथे प्रस्थान करून आजारी मेंढ्यांना उपचार करण्यास सुरुवात केली.यावेळी त्यांच्या समवेत डॉ.नेत्रा आस्वार,डॉ.कोकरे, डॉ.काळे, डॉ.राजेंद्र गायकवाड, सहाय्यक म्हापणकर यांच्यासह मदतीसाठी आलेले रासपचे कार्यकर्ते भगवान ढेबे,संपत ढेबे,विजय ढेबे, रविंद्र बोडेकर,अरूण मोरे यांच्या मदतीने आजारी मेंढ्यांना उपचार करून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले असता यातील काही मेंढ्या वाचल्याचे दिसून येत आहे.
____ कोट -
आजारांचे नक्की निदान लगेच समजू शकत नाही.मात्र आम्ही जे प्रयत्न करीत आहोत त्या प्रयत्नाला यश येत आहे.मृत पावलेल्या मेंढ्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर आपणास नेमके काय झाले आहे ते समजेल तो पर्यंत आमची संपूर्ण टीम व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आजारी मेंढ्या वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
डॉ.रोहिणी गायकवाड
तालुका पशुधन विकास अधिकारी, खालापूर
कोट -
अचानकपणे मृत झालेल्या मेंढ्या म्हणजे मेंढपाळावर आलेले हे आस्मानी संकट म्हणावे लागेल.या संकटात स्थानिक लोकांनी दाखविलेली सहानुभूती व संकटावर मात करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे कोकरे यांना धीर मिळाला आहे.पशुवैधकीय अधिकारी यांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे.
भगवान ढेबे
रासप कोकण विभाग अध्यक्ष तथा कार्यकारणी सदस्य रासप
0 Comments