दसरा सणाच्या निमित्ताने झेंडूची विविध ठिकाणी विक्री,नागरिकांची खरेदी लगबग

दसरा सणाच्या निमित्ताने झेंडूची विविध ठिकाणी विक्री,नागरिकांची खरेदी लगबग 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                       नागोठणे / शेतपळस : २३ ऑक्टोबर,

                संपूर्ण शहरातील मंदिरात, गावामध्ये  नवरात्रीची धूम सध्या सुरू असतांना मंगळवारी दसरा सण येत असल्यामुळे  बाजारपेठ विविध प्रकारची  फुलांची आवकसुद्धा मोठय़ा प्रमाणात होत असते.शंभर ते दिडशे रुपये प्रति किलो लाल झेंडू ,पिवळा झेंडू,निशिगंधा असे विविध प्रकारची फुले फुले मिळत असल्यामुळे फुले खरेदि साठी नागरिकांची विक्रीच्या ठिकाणी गर्दि झाल्यांचे पहावयास मिळत आहे.
              या वर्षी वेळेवर पाऊस न झाल्यामुळे फुले मार्केटमध्ये आवक काही अंशी विलंबाने झाली.आहे. नवरात्र उत्सवामध्ये घरातील देव्हार्‍यासमोर घट बसवल्यानंतर दररोज फुलांची माळ घटाला घालण्यात येते. दस-यांच्या निमित्ताने प्रत्येकजण, दुकानात तसेच वहान,घरासमोर तोरण बांधण्यासाठी,ही फुले खरेदि करुन हार बनविले जात असतात.तर काही नागरिक बाजारपेठ हार विक्रिते कडून हार घेतले जात असते.इतर वेळी आपण हार घेतो मात्र दस-या च्या सणानिमित्ताने घरीच झेंडू घेवून हार बनवित असल्यामुळे सध्या फुलांची विक्री मोठ्याप्रमाणावर होत आहे.
                    पूजा करताना पूजेसाठी लागणार्‍या साहित्यामध्ये फूल आवर्जून पूजेच्या ताटात असतेच. त्यामुळे फुलांना अधिक महत्त्व निर्माण झाले आहे.त्याच बरोबर किरकोळ स्वरूपात फुले घेण्यासाठी नागरिक रस्त्यावर मांडलेल्या स्टॉलवर फुले खरेदी करतात.ग्राहकांना परवडेल असा दर असून एक किलोपासून दहा किलोपर्यंत झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यात येते. असल्यामुळे दसर्‍याच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात फुले लागत आहे.यामुळे आता पासूनच अनेकांनी बुकिंग करण्याचे काम सुरू केले आहे.त्यामुळे मागणी तसा पुरवठा करण्याचे धोरण काही फूल विक्रेत्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

शनिवार दप्तर मुक्त शाळा,विद्यार्थ्यांनी बनवल्या ब्रेन कॅप,अगस्त्या फाऊंडेशन चा पुढाकार