प्रेमाचे बंध गुफले,तालुक्यात भाऊ बीज मोठ्या उत्साहाने साजरा पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा माजगांव / आंबिवली : १५ नोव्हेंबर, आज भाऊबीज असल्यामुळे पहाटेपासूनचं महिला वर्गांची लगबग सुरु होती.घरासमोर सुंदर रांगोळी काढून भाऊरायाचे स्वागत करण्यासाठी बहीण सज्य झाली होती.गाईच्या शेणांनी आणी लाल माती सारवून सुंदर अशी रांगोळी प्रत्येकांच्या घरासमोर पहावयास मिळत होती.विविध रंग भरुन सुंदर आणी मनमोहन रांगोळी प्रत्येकांच्या दारी पहावयास मिळत होती. दिवाळी सण मोठा आणी आनंदाला नाही तोटा असे या पंक्ती प्रमाणे सण साजरे केले जात होते. दिवाळी या सणामध्ये सर्वात मोठा आनंदाचा दिवस म्हणजे भाऊ बीज बहीण भावाच्या अखंड प्रेमाचा झरा म्हणावे लागेल.बहीण माहेर सोडून सासरी गेली असते यामुळे प्रत्येकाला सातत्याने जात येते असे नाही.मात्र या भाऊबीज च्या निमित्ताने भाऊ आपल्या बहीणीला भाऊ बीज करण्यासाठी जात असतो.तुरळक प्रमाणात बहीण भावाचे जरी काही वैर असेल तरी सुद्धा भाऊ या दिवशी बहीणीला भेटण्यासाठी जातचं असतो. गेले कितेक दिवस भाऊ आपल्याला भेटलाच नाही. फोनवर मात्र संपर्क होत कारण बहीण दुरच्या गावामधध्ये किंवा शहरामध्ये असल्यामुळे भावला बहणीकडे जावयास मिळत नसते.मात्र या दिवसाचे औचित्य साधून आपले काम बाजूला ठेवून भाऊ बहणीकडे जात असतो.बहीण भावाच्या पवित्र सणाला भावाला बहणीकडे जाण्यासाठी मिळाल्यामुळे बहीण भावाच्या चेहऱ्यावरील आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

 प्रेमाचे बंध गुफले,तालुक्यात भाऊ बीज मोठ्या उत्साहाने साजरा 





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली  : १५  नोव्हेंबर, 

                 आज भाऊबीज असल्यामुळे पहाटेपासूनचं महिला वर्गांची लगबग सुरु होती.घरासमोर सुंदर रांगोळी काढून भाऊरायाचे स्वागत करण्यासाठी बहीण सज्य झाली होती.गाईच्या शेणांनी आणी लाल माती सारवून सुंदर अशी रांगोळी प्रत्येकांच्या घरासमोर पहावयास मिळत होती.विविध रंग भरुन सुंदर आणी मनमोहन रांगोळी प्रत्येकांच्या दारी पहावयास मिळत होती. दिवाळी सण मोठा आणी आनंदाला नाही तोटा असे या पंक्ती प्रमाणे सण साजरे केले जात होते.
             दिवाळी या सणामध्ये सर्वात मोठा आनंदाचा दिवस म्हणजे भाऊ बीज बहीण भावाच्या अखंड प्रेमाचा झरा म्हणावे लागेल.बहीण माहेर सोडून सासरी गेली असते यामुळे प्रत्येकाला सातत्याने जात येते असे नाही.मात्र या भाऊबीज च्या निमित्ताने भाऊ आपल्या बहीणीला भाऊ बीज करण्यासाठी जात असतो.तुरळक प्रमाणात बहीण भावाचे जरी काही वैर असेल तरी सुद्धा भाऊ या दिवशी बहीणीला भेटण्यासाठी जातचं असतो. 
                     गेले कितेक दिवस भाऊ आपल्याला भेटलाच नाही. फोनवर मात्र संपर्क  होत कारण बहीण दुरच्या गावामधध्ये किंवा शहरामध्ये असल्यामुळे भावला बहणीकडे जावयास मिळत नसते.मात्र या दिवसाचे औचित्य साधून आपले काम बाजूला ठेवून भाऊ बहणीकडे जात असतो.बहीण भावाच्या पवित्र सणाला भावाला बहणीकडे जाण्यासाठी मिळाल्यामुळे बहीण भावाच्या चेहऱ्यावरील आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार