आंतरराष्टीय ध्यान विश्व विक्रम ,लाखो ,महिला,पुरुष ,युवक वर्ग यांचा घरबसल्या सहभाग
माय मराठी न्युज : वृत्तसेवा खोपोली : २४ डिसेंबर,
आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो.मात्र जिवनात ध्यान धारणा अतिषय महत्वाची असून या माध्यमातून मनाला समाधान तर मिळत असते.मात्र नकारात्मक उर्जा नष्ट होवून सकारात्मक उर्जा निर्माण होत असते.हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून नुकताच आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून (वर्ल्ड मेडिटेशन डे )जगभरात हा दिवस साजरा करण्यांत आला.या माध्यमातून सौरव बोत्रा यांच्या योगा एव्हरी डे या संस्थेच्या माध्यमातून करण्यांत आला.
यावेळी या कार्यक्रमात २८७७११ लोकांनी ऑनलाईन पद्धतीने एकत्ररित्या एक तास ध्यान धारणा करीत व्हरच्युअल मेडिटेशन चा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यांत आला.यामध्ये खोपोलीतील प्रसिद्ध रेकीशास्त्र,शिक्षक महेश निमणे यांचे सुखीवास्तु स्पिरिचुअल सर्व्हिसेस या संस्थेच्या माध्यमातून हजारो महिला, पुरुष व युवक वर्ग यांनी घरबसल्या ऑनलाईन सहभाग घेतला. आजच्या धावपळीच्या जिवनात ध्यान केल्यास शरीर आणि मन यांचे योग्य संतुलन कसे राखता येईल याचे महत्व समजावून घेतले.आणि या ऐतिहासीक क्षणाचे सहभागी झाल्याबद्धल त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत असून प्रत्येकाला यांचे प्रमाण पत्र ऑनलाईन देण्यांत आले.
0 Comments