खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात

 खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात






माय मराठी न्युज : गुरुनाथ साठेलकर 
 खोपोली  : २४ डिसेंबर
 
               खोपोली शहरात भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि श्वानदंशाच्या घटना नियंत्रित करण्याकरीता नागरिकांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने खोपोली नगर परिषदेच्या वतीने श्वानांचे निर्बिजीकरण आणि अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन मोहिम राबविण्याचा संकल्प मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी केला असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तरतुदीनुसार पेट्स फोर्स या संस्थेची नियुक्ती केली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मोहिमेस सुरूवात केली.  
         

खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील, माजी नगरसेवक किशोर पानसरे, सामाजिक कार्यकर्ते विजय तेंडुलकर, जैन संघटनेचे किशोर ओसवाल, गोरक्षक तथा  प्राणीमित्र हनीफ कर्जीकर, अमोल ठकेकर, श्री कृपा एक्वेरियमचे प्रवीण शेंद्रे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य, नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच जागरूक नागरिक त्याच या  मोहिमेत सहभागी झाले होते. 

           खोपोली शहरातील भटक्या श्वानांना टप्प्याटप्प्याने विभागवार सुरक्षित पकडण्यात येणार असून त्यांना रेस्क्यू व्हॅनमधून निर्बिजीकरण केंद्रात नेण्यात येणार आहे. निर्बिजीकरणासोबत अँटी रेबीज व्हॅक्सिनेशनही केले जाणार असून शस्त्रक्रियेनंतर श्वानाची प्रकृती स्थिरस्तावर झाल्यानंतर ज्या विभागातून त्यांना ताब्यात घेतले आहे.तेथेच पुन:श्च सोडण्यात येणार असल्याची माहिती पेट्स फोर्स संस्थेचे विनोद साळवी यांनी दिली. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय परिसर आणि समाज मंदिर रस्त्यावर असलेले श्वानांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही मोहीम दररोज राबवण्यात येणार असल्यामुळे या मोहिमेचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात