नेताजी पालकर मंडळ चौक,किल्ले स्पर्धेचे कौतुक,२६ नोव्हेंबर ला होणार बक्षिस वितरण
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
चौक : १५ नोव्हेंबर,
नेताजी पालकर मंडळ चौक च्या माध्यमातून या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.गेली ३८ वर्ष हे मंडळ उपक्रम राबवित असतांना विद्यार्थ्यांचा मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.चौक, जांभिवली, धारणी, हातनोली, वावर्ले, नानीवली या गावांमध्ये किल्ले स्पर्धेत ६० मुलांनी सहभाग घेतला होता.यावेळी उत्तम असे किल्ले,तयार करून उपस्थित परिक्षकांची मने जिंकली होती,यावेळी किल्या मध्ये भुयारी मार्ग,विहिरी,शेती,दारुगोळा ठेवण्यांची खोळी,तोफ खाना,धान्य साठविण्यासाठी खोली,अदि या मध्ये दाखविण्यात आले होते.
या किल्ले स्पर्धेचे परीक्षण निसर्ग मित्र संस्था पनवेल चे कार्यकर्ते रश्मी शिरसकर ,अनिता मगदूम, रुपाली पाटील, प्रदीप कुलकर्णी,राज इंदवटकर, ओम सुर्वे,संजय कुमठेकर यांनी केले.
हे किल्ले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेताजी पालकर मंडळाचे संघटक यशवंत सकपाळ, स्पर्धा प्रमुख भूषण पिंगळे, कार्यकर्ते अनिल खंडागळे, राजेंद्र दुर्गे, जितेंद्र ठाकूर, कृष्णा गावडे, अशोक मोरे, सुदेश महागावकर, मंदार ठकेकर यांनी मेहनत घेतली.तसेच ह्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ नेताजी पालकर जन्मस्थळ, हनुमान मंदिर चौक येथे रविवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार असल्यांचे समजते.
0 Comments