बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी सोहम पवार
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
माजगांव : २५ डिसेंबर
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्दात विचारांतून राजिप शाळा वडगांव येथे १६ स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले होते.यावेळी तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.माजगांव शाळेत तिसरी वर्गामध्ये शिकत असलेला सोहम मंगेश पवार यांने बेचकीच्या अचुक लक्षवेध करुन प्रथम क्रमांक पटकावित उपस्थितांची मने जिंकली तसेच जिल्हास्तरीय बेचकीने नेम धरणार आहे असे समजते.
तसेच या ठिकाणी क्रीडा सांस्कृतिक व व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले होते.इयत्ता ५ वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी लगोरी स्पर्धेमध्ये बीटा कडून खेळला असतांना द्वितीय क्रमांक पटकावला.
यावेळी माजगाव केंद्राचे केंद्रप्रमुख परदेशी,गटशिक्षणाधिकारी - चोरामले,शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय - शिल्पा दास,मुख्याध्यापक - किरण कवाद,शिक्षिका -रेखा जाधव अदि उपस्थित होते.
0 Comments