ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर

 ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर 




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
चौक : १९ डिसेंबर,

            राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम अंतर्गत एक महिना ते  १८ वर्ष वयोगटातील १३५ हून अधिक अंगणवाडी व शाळेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यांत आली यावेळी त्यांचे डोळे,दंत्त,रक्त तसेच काही शारिरिक तुटी असलेल्या मुलांस औषध देण्यांत देवून उपस्थित पालकांस मुलांच्या आहार,स्वच्छता विषयी मार्गदर्शन चौक येथिल ग्रामीण रुग्णालय येथे करण्यांत आले.

              यावेळी खोपोली येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.प्रमोद वानखेडे व ग्रामीण रूग्णालय चौक ता.खालापूर येथील वैद्यकिय अधीक्षक व बालरोग तज्ञ डॉ.सविता काळेल,डॉ.चोरे ,डॉ.रामशेट्टे ,डॉ ओव्हाळ, डॉ.मोहित ,डॉ.यादव, सिद्धी डोंगरे, राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम अंतर्गत  कर्मचारी,परिचारिका विद्या पवार,प्रयोगशाळा तज्ञ  मोकल व रुग्णालयातील सर्व कर्मचारी,राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम अंतर्गत  कर्मचारी ,आय.सी.टी.सी. विभाग लोंढे, यांचे सहकार्य लाभले.


          यावेळी कैलाश  सोनार यांच्याकडून फळे वाटप करण्यात आले व तसेच डॉ.आर.एम.पाटील सर कडून लाडू वाटप करण्यात आले.
 
 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर