ग्रुप ग्राम पंचायत होनाड चे सरपंच प्रकाश पाटील यांची मुलगी व जावई यांच्या हस्ते साजगांव येथिल विठ्ठल रखुमाईच्या महापूजाचा मान
पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप
साजगांव : २३ नोव्हेंबर
खोपोली -पेण रस्त्यावर ताकई गावाच्या या हद्दीत साजगांव येथे उंच अश्या टेकडीवर विठ्ठल रखुमाई चे सुंदर मंदिर असून कार्तिकी एकादशी च्या निमित्ताने,आज या ठिकाणी सलग पंधरा दिवस यात्रा भरली जात असते.तसेच देवस्थान कमिटी च्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे कार्तिकी एकादशी च्या निमित्ताने महापूजा कारण्यांचा मान मिळत असतो.या वर्षी ग्रुप ग्राम पंचायत होनाड चे नवनिर्वाचित सरपंच प्रकाश पाटील यांची मुलगी व जावई - विशाल मनोहर थोरवे,विनया विशाल थोरवे - उकृल यांच्या हस्ते विठ्ठल - रखुमाई यांची महापूजा कारण्यांचा मान यावेळी त्यांस मिळाला.
कर्तिकी एकादशी च्या निमित्ताने ह्या मंदिरांचा गाभारा उत्तम अश्या फुलांनी सजविण्यात आले होते.आज मोठ्या संख्येने पायी दिंडी काढून वारकरी,भाविक या ठिकाणी दाखल होवून विठुरायांच्या चरणी नतमस्तक झाल्यांचे पहावयास मिळाले.त्याच बरोबर या ठिकाणी भरलेली जत्रा पहाण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक जण या ठिकाणी येत असतात.कार्तिकी एकादशी पासून सलग १५ दिवस यात्रेचे आयोजन खोपोली नगर पालिका ताकई मंदिर देवस्थान कमिटी सयुक्त रित्या करण्यात येत असते. संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली धाकटी पंढरी येथे संत तुकाराम महाराज घाटमाथ्यावरून मिरची व्यापार करण्यासाठी या परिसरात येत असत.परंतू मिरची विकल्यानंतर पैसे वसूल झाले नाही.तेव्हा तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाच्या नावाने बोंब मारल्या तेव्हा पासून या विठ्ठलास बोंबल्या विठोबा असेही संबोधले केल्याची आख्यायिका आहे.या ठिकाणी सांगितली जात आहे.मात्र दर वर्षी लाखोच्या संखेने भाविक भक्त येत असून त्या विठुराचे दर्शन घेत आहे.थोरवे यांस महापुजा करण्यांच मान त्यांस मिळाल्या मुळे येथिल ग्रामस्थांनी कमिटी यांचे आभार व्यक्त केले आहे.
0 Comments