विक्रम गायकवाड यांस प्रेस मिडीया लाईव्ह कोल्हापूर येथे समाज रत्न पुरस्करांने सन्मानित

 विक्रम गायकवाड यांस प्रेस मिडीया लाईव्ह कोल्हापूर येथे समाज रत्न पुरस्करांने सन्मानित,


प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री -  पद्मजा खटावकर, यांच्या हस्ते प्रधान 






माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
चौक : २२ एप्रिल,

          प्रेस मिडीया लाईव्ह,५ वा वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रीय पुरस्कार वितरण शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे घेण्यांत आले.यावेळी चौक ( रायगड ) या  वावंढळ गावामध्ये राहत असलेले  सामाजिक कार्यकर्ते विक्रम गायकवाड यांस समाज रत्न पुरस्कार देवून गौरविण्यांत आले.शाळ श्रीफळ,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह आश्या या पुरस्कारांचे स्वरुप असून प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री - पद्मजा खटावकर यांच्या उपस्थित व मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान  प्रदान करण्यांत आले.यावेळी रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.विक्रम यांस पुरस्कार प्राप्त झाल्यांचे कळताच विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मान्यवरांनी त्यांस शुभेच्छा दिल्या.
                   विक्रम हे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य तसेच भावी सरपंच म्हणून नावारुपाला आलेले असून ते सामाजिक,राजकीय,शैक्षणिक आश्या विविध माध्यमात ते अग्रेसर असून,आजवर त्यांचे समाज्यासाठी मोठे योगदान ठरत आहे.त्यांच्या मध्ये असलेले गुण समाज्याच्या प्रेरणादायक ठरत असून त्यांनी विविध उपक्रम राबवून या परिसरात आपला ठसा उमठविला आहे.त्यांच्या मध्ये असलेले सामाजिक चळवळ पाहता त्यांस समाज रत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यांत आले.

         या  पाचवा वर्धापन राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे  या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नगरसेवक पुणे मनपा ॲड.आयुब शेख - संस्थापक अध्यक्ष शांताई संस्था पुणे -  रश्मी बापूसाहेब कांबळे,वरिष्ठ पत्रकार पुणे - फिरोज मुल्ला, संपादक दैनिक गगनतारा कोल्हापूर - सुभाष भिके, संपादक दैनिक अप्रतिम शिरोळ - रविराज कृष्णा येवले, चित्रपट कलाकार इचलकरंजी - मोहम्मद रफीक मांगुरे, मुख्य संपादक अल्फाज टाईम पुणे - राजे खान पटेल,
        तसेच मुख्य संपादक महबूब सर्जेखान, पश्चिम महाराष्ट्र संपादिका - प्रमोदिनी माने, उपसंपादक - श्रीकांत कांबळे ,प्रतिनिधी कोल्हापूर - मुरलीधर कांबळे अदि उपस्थित हा सोहळा संपन्न झाला.   
                           



Post a Comment

0 Comments

दत्तात्रेय रामचंद्र काठावले यांचे अल्पशा आजाराने निधन