माजी मंत्री महादेव जानकर यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी,१९ एप्रिल रोजी वावोशीत होणार वाढदिवस साजरा
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १८ एप्रिल,
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांचा वाढदिवस १९ एप्रिल रोजी असून हा वाढदिवस रासपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वावोशी येथे साजरा करणार आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी गेल्या ३५ वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोर गरीब उपेक्षित बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य घालवले आहे. त्यांनी कधीही स्वतःच्या घराचा विचार न करता समाजाच्या उन्नतीसाठी, शोषित पीडित वंचित उपेक्षित कष्टकरी, शेतकरी कामगार यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले आहे.
रासपची पक्ष संघटना महाष्ट्रात मोठ्या प्रमाणात असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यातच कोकणातही त्यांना मानणारा मोठा वर्ग असून यावेळी खालापूर तालुक्यातील वावोशी येथे त्यांचा ५७ वा वाढदिवस मोठया उत्सहात साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांनी केले आहे
0 Comments