भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष पदी सनी यादव यांची निवड

 भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष पदी सनी यादव यांची निवड 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : २१ एप्रिल,

         भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सध्या सुरू आहे. त्याला अनुसरून पक्षाच्या खालापूर तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष पदी सनी यादव यांची नियुक्ती आज करण्यात आली. सनी यादव हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी ह्या पूर्वी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. भाजपच्या खालापूर तालुका अध्यक्षपदी निवडीसाठी महड येथे भाजपा कार्यकर्त्यांची बैठक झाली.यावेळी खालापूर तालुका मंडळ  अध्यक्ष म्हणून निवड करण्यांत आली.
             या वेळी पक्षाचे धोरणा नुसार सूचक खालापूर शहर अध्यक्ष दिपक जगताप व अनुमोदक जयेंद्र पाटील स्वाली बूथ अध्यक्ष यांच्या अनुमतीने सनी यादव यांची  निवडीनंतर सनी यादव सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी देण्यांत दिले. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचविणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे आवाज उठवणे, हेच पक्षाचे मुख्य ध्येय राहील असे सनी यादव यांनी मनोगतात सांगितले. 
            यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष- अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस - दिपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष - विठ्ठल मोरेखालापूर निवडणूक प्रमुख- नितीन कांदनगावकर, अध्यात्मिक आघाडी रायगड जिल्हा संयोजक- काशिनाथ पारठे, रायगड जिल्हा किसान मोर्चा संयोजक - अतुल बडगुजर , महिला मोर्चा खालापूर तालुकाअध्यक्ष - सुजाता दळवी , खालापूर तालुका युवा मोर्चा तालुका अध्यक्ष - नागेश पाटील खालापूर तालुका सरचिटणीस - रविंद्र पाटील,हरिभाऊ जाधव, जगदीश आगिवले, विकास रसाळ, खालापूर शहर अध्यक्ष - दिपक जगताप  संजय देशमुख, रवी मोरे, प्रवीण पाटील, हेमंत पाटील , वत्सला ताई मोरे, राश्वेता ताई मनवे, राखी ताई गणेशकर, निकिता हेलांडे, सुप्रिया तटकरे आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पाषाणे येथिल धरणामध्ये  टुरिस्ट व्यवसायीकाचा  मृत्यू