शिरवली ग्रामपंचायतच्या बिनविरोध उपसरपंचपदी रासपचे विजय ढेबे, खालापुरात रासपचे खाते उघडले

 शिरवली ग्रामपंचायतच्या  बिनविरोध उपसरपंचपदी  रासपचे विजय ढेबे, खालापुरात रासपचे खाते उघडले



पाताळगंगा न्यूज :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर : २६ नोव्हेंबर 


              शिरवली ग्रामपंचायतच्या निवडणूकित राष्ट्रीय समाज पक्षाकडून विजय मारुती ढेबे यांनी उमेदवारी मिळवून सदस्य पदी भरघोस मतांनी निवडून येत बिनविरोध उपसरपंचपदी बसण्याचा मान मिळाला आहे, 
              खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या शिरवली ग्रामपंचायतीची  सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून थेट सरपंच पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश पाटील हे निवडून येत 3 सदस्य निवडून आले आहे 
               ढेबेवाडी राहणारे तरुण तडफदार युवा नेतृत्व विजय ढेबे यांनी  निवडणुक  राष्ट्रीय समाज  पक्षा कडून लढविली होती मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊन ते आज शिरवली ग्रामपंचायतच्या  बिनविरोध  उपसरपंच पदी विराजमान झाले आहेत.
            राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या आदेशानुसार कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संपत ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय ढेबे  यांनी निवडणूक लढविली असून त्यांचा या निवडणुकीत महत्वाचा वाटा आहे,                                                                              खालापुर तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाने खाते उघडले असून उपसरपंच पदी विराजमान होण्याचा मान रासपला मिळाला आहे, त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणूकिची  राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार तयारी केली आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर