शेतकरी वर्गांनी आंबा,काजू फळझाडे यांचा ई पीक विमा उतरावे - तालुका कृषी अधिकारी, खालापूर सुनिल निंबाळकर यांचे आवाहन

 शेतकरी वर्गांनी आंबा,काजू फळझाडे यांचा  ई पीक विमा उतरावे  - तालुका कृषी अधिकारी, खालापूर सुनिल निंबाळकर यांचे आवाहन 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खोपोली  : १८ एप्रिल,

            आंबा व काजु हे फळपिक निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे हे पिक धोक्यात येते.चालले आहे.यामुळे शेतकरी वर्गांस मोठ्या नुकसान सहन करावे लागते.मात्र या पीक पाहणी योजने अंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांना पीक संरक्षित रक्कम मिळत असते. ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये फळपिक विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी फळपिक पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे २५ एप्रिल पर्यंत पूर्ण करुन घ्यावी. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, खालापूर सुनिल निंबाळकर यांनी केले आहे.
          सदर योजना १२ जून २०२४ रोजी शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे रायगड जिल्हामध्ये आंबिया बहार सन २०२४-२५ कुरिता युनिर्क्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत आंबा व काजु या फळपिकांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.यामुळे शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी करणे बंधनकारक
         सदर विमा संरक्षित क्षेत्राची ई- पीक पाहणी २५ एप्रिल पर्यंत पूर्ण करुन घ्यावी अन्यथा योजनेच्या निकषानुसार ई -पीक पाहणी नोंद नसलेले सर्व विमा अर्ज कंपनीमार्फत रद्द करण्यात येतील,व फळपिक विमाचा लाभ मिळणार नाही. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी, खालापूर सुनिल निंबाळकर यांनी दिली तसेच त्यांनी सर्व विमाधारक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणेबाबत आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments

लायन्स क्लब खालापूर अध्यक्ष पदि किशोर पाटील यांची नियुक्ती