तळा येथील शेतकऱ्यांची लौकिक उदयोग समूहास भेटउद्यान पंडित उदय बापट यांचे मागदर्शन

 तळा येथील शेतकऱ्यांची लौकिक उदयोग समूहास भेटउद्यान पंडित उदय बापट यांचे मागदर्शन





पाताळगंगा न्यूज : कृष्णा भोसले
   तळा : २६ नोव्हेंबर 

                  तळा तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या नवकृषक शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांसाठी दिवेआगर ता.श्रीवर्धन येथील लौकिक या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या आंबा प्रकल्प प्रक्रिया उदयोगास भेट देण्यात आली सदर  दौऱ्याचे आयोजन नवकृषक शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने करण्यात आले होते.या प्रक्रिया उद्योगाचे मालक व उद्यान पंडित उदय बापट यांनी केलेल्या दर्जेदार उत्पादनामुळे व उत्कृष्ट चवीमुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये लौकिक हा ब्रँड  ओळखला जातो. 
                 उदय बापट यांनी या उदयोग विषयी मार्गदर्शन करताना प्रकल्पसाठी आंबा खरेदी, आंबा मालाची प्रतवारी, आवश्यक मशनिरी,ब्रॅडिंग, पॅकिंग, मूल्यवर्धन,उद्योग उभारणीसाठी आवश्यक परवाने,निर्यातक्षम पल्प उत्पादन, साठवणू व विक्री व्यवस्था नियोजन तसेच आंबा पल्प तयार करण्याविषयी पूर्ण प्रक्रिया आदींबाबत सविस्तर माहिती दिली व रायगड जिल्यातील हापूस आंबा उशिरा येत असल्याने आंबा पल्प तयार करण्यासाठी कमी दरामध्ये आंबा मोठया प्रमाणात उपलब्ध  होत असल्याचेही त्यांनी सांगितले व या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले.
          यानंतर तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी तळा तालुक्यात हापूस आंबा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून सदर आंबा प्रक्रिया उदयोग  तालुक्यात  ज्यास्तीत ज्यास्त उभारावेत यासाठी कृषी विभाग  प्रयत्नशील असल्याचे व प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत या प्रकल्पना आर्थिक सहाय्य करण्यात येणार असल्याचे  सांगितले यानंतर नवकृषक शेतकरी उत्पादक कंपनी राबवित असलेल्या व भविष्यातील उपक्रमाविषयी  माहिती अध्यक्ष मधुकर वारंगे यांनी दिली.
                राहुल जाधव वाकळघर यांच्या काजू प्रक्रिया युनिटला भेट देण्यात आली या वेळेस  राहुल जाधव यांनी विस्तृत मार्गदर्शन केले या वेळेस उद्यान पंडित उदय बापट, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे,नवकृषक शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मधुकर वारंगे,मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव,श्रीवर्धन आत्मा बीटीएम योगेश महाले ,रमेश सपकाळ,प्रकाश मुंडे,आनंद घाग,राहुल जाधव ,सचिव अंकित खेडेकर, नामदेव शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण