रा.जि.प.शाळा वडगाव चे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांची सीसीआरटी प्रशिक्षणासाठी निवड

 रा.जि.प.शाळा वडगाव चे मुख्याध्यापक सुभाष राठोड  यांची सीसीआरटी प्रशिक्षणासाठी निवड




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
वडगांव : २६ नोव्हेंबर 



                    रा.जि.प.शाळा वडगाव चे मुख्याध्यापक सुभाष राठोड  यांची  सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र नवी दिल्ली यांच्यामार्फत 'रोल ऑफ पपेट्री इन एज्युकेशन इन लाईन विथ एन.इ.पी.२०२०' या प्रशिक्षणासाठी  मधापूर,हैदराबाद येथे निवड झाली आहे. सदर प्रशिक्षण दि.०६/१२/२०२३ ते दि.२०/१२/२०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे.सुभाष राठोड सर जिल्ह्यात उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. यापूर्वीही त्यांची नवी दिल्ली,भोपाळ,जयपूर येथे एनसीईआरटी च्या विविध  प्रशिक्षणासाठी निवड झाली होती.
                तसेच त्यानी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये विविध वरिष्ठ पदांवर उत्कृष्ट कार्य केलेले आहे.गडचिरोली सारख्या आव्हानात्मक जिल्ह्यात  दौरा यशस्वी पूर्ण केला आहे.त्याचबरोबर एससीईआरटी पुणे येथे विषय सहाय्यक म्हणून कार्य केले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ(SSC/HSC BOARD), पुणे येथे राज्य समन्वयक म्हणून कार्यरत असताना.महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या स्थापने पासून ते हजारो अशिक्षित, शिक्षण सोडलेल्या बालकांना,मजुरांना,प्रौढांना शिक्षण प्रवाहात आणून  प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी योगदान दिले आहे.
                   बालभारतीच्या इतिहास व नागरिकशास्त्र अभ्यासमंडळ समितीवर इयत्ता ६  वी ते १२  च्या पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभाग असुन,पाठ्यपुस्तकातील QR code वरील साहित्य गुणवत्ता तपासणी व निर्मितीत त्यांचा सहभाग आहे.नुकतेच त्यांनी शाळा गैरहजर विद्यार्थ्यांच्या घरी हा शाळेत दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमामुळे तालुका,जिल्हा व राज्य च नव्हे तर टाईम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशाचे लक्ष वेधून घेतले होते.
                यापूर्वी ते विविध मंत्र्यांकडे स्वीय सहायक व विशेष कार्य अधिकारी म्हणून मंत्रालयात सुद्धा प्रभावी कामगिरी केलेली आहे.त्यांची काम करण्याची सचोटी पाहता रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच शिक्षक संघटनांनी स्थापन केलेल्या रायगड जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या जिल्हा संघटकपदी राठोड यांची शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निवड केली आहे.हरहुन्नरी व उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची या प्रशिक्षणासाठी झालेली निवड योग्य असून,ते नक्कीच शालेय उपक्रमात अजून भरीव योगदान देतील.त्यांचे मा.सरपंच, शाळा व्यवस्थापन,ग्रामस्थ,विद्यार्थी सहकारी शिक्षक यांचेकडून अभिनंदन होत आहे.त्यांचे सोबत राज्यातील इतरही ९ शिक्षकांची या प्रशिक्षणासाठी निवड झालेली आहे.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण