नव निर्वाचित सरपंच,उप सरपंच सदस्य सह आंबिवली येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांस अभिवादन करण्यांचा विसर ,माजी सरपंच गोपीनाथ जाधव यांनी केली खंत

 नव निर्वाचित सरपंच,उप सरपंच सदस्य सह आंबिवली येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांस अभिवादन करण्यांचा विसर ,माजी सरपंच गोपीनाथ जाधव यांनी केली खंत 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                                         माजगांव / आंबिवली २० नोव्हेंबर,


                   ग्रूप ग्राम पंचायत माजगांव या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेद्वार या निवडणूकीत यश संपादन केल्यामुळे शुक्रवारी पदग्रहण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी माजगांव येथिल हिंदुचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यांस अभिवादन करण्यात आले.मात्र आंबिवली येथिल असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांस  अभिवादन करण्यांचा विसर झाला आहे. आशि खंत मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांनी प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.

               निवडणुकीच्या वेळी रॅली काढण्यात आली की छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्यांस सर्व सदस्य सरपंच निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेद्वार अभिवादन करीत होते.मात्र पदावर बसल्यावर लगेच विसर पडला की काय? राजिप शाळेच्या येथे असलेले छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्यांस अभिवादन करण्यांस विसर पडले नाही.मात्र आंबिवली नव्याने स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांस अभिवादन करण्यांचा विसर कसा पडला.

            मा. सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या कार्यकाळ बांधण्यात आलेले शिव स्मारकास अभिवादन करण्यात नवनिर्वाचित महाविकास आघाडीने पाठ फिरविल्यामुळे नाराजीचा सुर उमठत आहे.सदर नवनिर्वाचित झालेल्या चुकीबद्दल कोणतीही खंत व्यक्त केली नाही. मात्र ही बाब मा.सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या निदर्शनास येताच तिव्र नाराजी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर