लायन्स क्लब खालापूर च्या माध्यमातून,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर,विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य,व ब्लॅंकेट वाटप
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
माडप : १७ डिसेंबर,
लायन्स क्लब खालापूर विविध उपक्रम हाती घेत असतांना, माडप गावापासून दुर्गम भागात वास्तव्ये करीत असलेल्या माडप ठाकूरवाडी येथे जावून येथिल नागरिकांची मोफत नेत्र तपासणी आणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यांत येणार आहे. तसेच येथिल ग्रामस्थांना हिवाळ्यामध्ये थंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे ब्लॅंकेट वाटप करण्यांत आले.त्याच बरोबर या ठिकाणी शाळेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप करुन त्यांच्या चेह-यावर हास्य आणी समधानांचे भाव निर्माण करण्यांचे काम लायन्स क्लब च्या पदाधिकारी यांनी केले.
या नेत्र तपासणी शिबारात ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळालेल्यांचे पहावयांस मिळाले,यावेळी २०० हून अधिकांनी डोळ्यांची तपासणी करण्यांत आली.शिवाय मोतीबिंदू असल्यांस त्यांचे विनामुल्य शस्त्रक्रिया करण्यांत येणार असल्यांचे लायन्स क्लब च्या पदाधिकारी यांनी सांगितले. उपक्रमात नायर हॉस्पिटल पनवेल तसेच रसायनी एम.आय.डी.सी लायन्स क्लब पनवेल यांचे सहकार्य लाभले.
यावेळी अध्यक्ष लायन्स क्लब खालापूर - शिवानी जंगम,खजिनदार प्रोजेक्ट हेड - किशोर पाटील,जिल्हा समन्वयक - ज्योती देशमाने,प्रथम जिल्हा प्रांतपाल - संजिय सूर्यवंशी, द्वितीय जिल्हा प्रांतपाल - प्रविण सरनाईक, जिल्हा प्रांतपाल - एन.आर.परमेश्वरन,त्याच बरोबर अध्यक्ष लायन्स क्लब रसायनी - दत्तात्रेय जांभळे,
अध्यक्ष लायन्स पनवेल एस.जी. चव्हाण,तसेच मा सरपंच हरेश पाटील ,मा सदस्य मंगेश पाटील
मा सरपंच - नितीन पाटील, यशवंत वाघ मा सदस्य भरत पाटील, लहू भोईर, नागेश देशमाने,राज जाधव
0 Comments