अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावेत - तहसीलदार : अभय चव्हाण

 अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावेत - तहसीलदार : अभय चव्हाण 



माय मराठी न्युज : गुरुनाथ साठेलकर 
खालापूर : १७ डिसेंबर,

            गेल्या काही दिवसात खालापूर तालुक्यातील विविध मार्गावर झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांची संख्या पाहता अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये उपचारासाठी मदत मिळावी याकरिता तालुक्यातील विविध आस्थापना, संस्थांसोबत  खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सरनोबत नेताजी पालकर सभागृहात औपचारिक बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीदरम्यान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले.तर नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी महसूल प्रशासनाकडून या समस्येवर उपाय योजनांसाठी अपेक्षित असलेल्या लोक सहभागाची आणि सहकार्याची विस्तृत मांडणी केली. 

इंडस्ट्रियल असोसिएशनचे चंद्रकांत कुलकर्णी.


AMNS कंपनीचे वैद्य

              पाली- खोपोली, खारपाडा - सावरोली, पेण - खोपोली, कर्जत - खोपोली मार्गावर तातडीने अपघातग्रस्तांना ॲम्बुलन्स अभावी मदत मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहेत.त्याकरिता या मार्गावरील अस्थापनांनी अपघातग्रस्तांना स्वमालकीची ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.त्यासाठी सी.एस.आर फंडाचा वापर करण्याचा सल्ला तहसीलदार अभय चव्हाण यांनी उपस्थितांना दिला. 

डॉक्टर : सविता कालेल

          नायब तहसीलदार सुधाकर राठोड

इंडस्ट्रियल असोसिएशनचे चंद्रकांत कुलकर्णी, चौक उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ.सविता कालेल, ए.एम् एन.एस कंपनीचे किरण वैद्य, ए.पी.आय ठाकरे यांनी या संकल्पनेचे स्वागत करून आपापले विचार मांडले. लवकरच या बाबतीत संयुक्तिक प्रक्रिया पूर्ण करून यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा आशावाद तहसीलदार अभय चव्हाण यांनी व्यक्त केला.   

         तहसीलदार अभय चव्हाण

 
            अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने बैठकीच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. एम.एस.आर.डी.सी, एम.आय.डी.सी, पी डब्ल्यू डी, आय.आर.बी आणि आरोग्य खात्यातील अधिकारी यांच्यासह तालुक्यातील बहुतांशी कंपन्यामधील अधिकारी वर्ग या बैठकीस उपस्थित होता. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर