पाताळगंगा नदितीरावर उत्तर भारतीयांची छट पुजा

 पाताळगंगा नदितीरावर उत्तर भारतीयांची छट पुजा 





पाताळगंगा न्यूज :वृत्तसेवा 
वाशिवली  : १९ नोव्हेंबर,

               जीवन सुखदायी, संपन्नदायी, समृध्दीने परिपूर्ण बनण्यासाठी उत्तर भारतीय समाजाच्या वतीने पाताळगंगा नदिच्या ठिकाणी  छटपूजा आयोजित करण्यात आली.यावेळी  पाताळगंगेचा संपूर्ण परिसर उत्तर भारतीयांमुळे गजबजून गेल्यांचे दृश्य पहावयास मिळाले. कुटुंबासमवेत छट पुजा करण्यासाठी गर्दि असल्यामुळे  या ठिकाणी यात्रे सारखे प्रचंड स्वरूप निर्माण झाले होते.                                                                 उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर छटपूजा आयोजित केली जाते; परंतु ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे. त्या गंगेच्या किनारी पूजेला जास्त महत्त्व असल्याने उत्तर भारतीय धार्मिक ठिकाणाच्या नदीकिनारी जाऊन पूजा करण्यात आली.  नदीतीरावर छटपूजेसाठी महिलांनी उसाचे चौरंग मांडून पूजा करुन नदि पात्रात दिवे सोडण्यात आले. त्याच बरोबर प्रसाद म्हणजे पूजेसाठी आनलेली फळे एकमेकांना म्हणून देण्यात आली.छटपूजेनिमित्ताने  सूर्याला अर्घ्य जल दिल्याने परिवाराला सुख, समाधान प्राप्त होते.असे मत यावेळी योगेंदर प्रसाद,सन्नी प्रसाद,शरद प्रसाद,वर्षा प्रसाद,पिंटु प्रसाद,अशोक यादव,जानवी यादव,आर्यन यादव,पुशपेंद्रर प्रसाद ,साक्षी सोनंकी प्रसाद यांनी व्यक्त केले.       

चौकट : 

         आयुष्यात कोणतेही संकट येऊ नये, जीवनात भरभराटी, उन्नती होण्यासाठी महिला छटपूजा करतात. त्या घरीच दोन दिवस उपवास करतात व रात्री खीर व फळे खातात. तिस-या दिवशी संध्याकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देतात व चौथ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य जल देऊन तीन दिवसांचे उपवास सोडत असतात ( वर्षा प्रसाद)

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर