धनगराचा वाघ आरक्षणासाठी पुन्हा मैदानात

धनगराचा वाघ आरक्षणासाठी पुन्हा मैदानात 
२१ नोव्हेंबरला आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज  देणार प्रत्येक तहसीलदारांना निवेदन 


पाताळगंगा न्यूज :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर : १९ नोव्हेंबर,


                    धनगर समाजाला एसटी सर्टिफिकेट मिळावे यासाठी गेल्या ७० वर्षांपासून  आंदोलन मोर्चा काढीत असून कोणत्याही सरकारने अद्याप याकडे लक्ष दिले नाही, 
                 सरकारने धनगर समाजाला दिलेल्या आस्वासनाला ५०  दिवस उलटले असून याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही, त्यामुळे धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून २१  नोव्हेंबरला त्यांच्या नेतृत्वाखाली  राज्यातील प्रत्येक तहसीलदारांना धनगर समाज निवेदन देणार आहे, 
              या निवेदनात धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा, ही प्रमुख मागणी असून अजूनही काही मागण्या आहेत, अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच मुबंई यांच्या वतीने धनगर आरक्षणाची उच्च न्यायालयात दाखल याचिकेत ॲड. कुंभकोनी यांची नियुक्ती कायम करणे, मेंढपाळासाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींची सहकारी मंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची  घोषणा करून योजना कार्यान्वित करणे, जे आदिवासींना ते धनगरांना या प्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या २२ योजनांपैकी  काही प्रभावीपणे राबविल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही त्याचा आढावा घेऊन उपाययोजना करावी , 
               मेंढपाळावर होणारे हल्ले यासाठी स्वतंत्र कायदा करून त्यांना संरक्षण देणे, बिरोबा देवस्थान ता  आरेवाडी, श्री महालिंगराया हुलजती ता मंगळवेढा, श्री बिरोबा देवस्थान हुंनूर, मंगळवेढा ,श्री विठ्ठल बिरदेव देवस्थांन पट्टणकोडली, ता हातकणंगले, श्री वाशी अवघडखान देवस्थान वाशी ता करवीर ,या मूळ स्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी  २००  कोटी रुपयांचा निधी द्यावा, महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले  वाफगावचा किल्ला सरकारने ताब्यात घेऊन त्यांचे सर्वधन करावे, अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण करून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावे 
                    या मागण्यांसाठी आमदार  गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली  २१ नोव्हेंबर रोजी धनगर समाज हा राज्यातील प्रत्येक तहसीलदार यांना निवेदन देणार असून सरकारला आठवण करून देणार आहे,

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर