मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुभाष पुजारी यांनी मिळविले गोल्ड मेडल

 मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुभाष पुजारी यांनी मिळविले गोल्ड मेडल




पाताळगंगा न्यूज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : १७ नोव्हेंबर,

                साऊथ कोरिया येथे ६  ते १२  नोव्हेंबर संपन्न झालेल्या १४  व्या 'मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धा २०२३ ' मधे सहा. पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी ८०  किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवत मुंबई व महाराष्ट्र पोलीस दलाचा बहुमान वाढवून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविला
           

    इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फेडरेशनच्या वतीने सुभाष  पूजारी यांची भारतीय संघातून निवड करण्यात आली होती. ते 'मिस्टर ऑलिम्पिया' सुनीत जाधव   यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सहा तास सराव करत होते. या स्पर्धेत जगभरातून ४१  देशांच्या संघातील ४५०  खेळाडुनी सहभाग नोंदविला होता.  आजवर सुभाष पुजारी यांनी मिळवलेल्या ८  इंटरनॅशनल मेडलच्या अनुभवाच्या शिदोरीवर आणि वर्ल्ड बॉडीबिल्डींगचे सेक्रेटरी चेतन पाठारे, वर्ल्ड बॉडीबिल्डिंगचे लिगल अँडव्हायझर विक्रम रोठे, रागिणी पुजारी, आनंद गुप्ता, गॅम्प्रो ड्रिलिंग कंपनी खालापूरचे संचालक विवेक गुप्ता यांचे विशेष सहकार्यातून या स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत सुवर्ण पदक पटकावले.
       

      सुभाष पुजारी यांनी संपादन केलेल्या या अभूतपूर्व यशा बद्दल पोलिस महासंचालक रजनीश शेठ,   डॉ.भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसाळकर, हेमंत नगराळे,  सेवानिवृत्त पोलीस महासंचालक विनय करगावकर, अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) महाराष्ट्र राज्य निखिल गुप्ता, पोलीस सहआयुक्त प्रशासन मुंबई शहर एस जयकुमार, पोलीस सह आयुक्त  (वाहतूक) प्रवीण कुमार पडवळ,  पोलिस महानिरिक्षक (प्रशासन ) निसार तांबोळी, पोलीस उपायुक्त वाहतूक राजू भुजबळ यांच्यासह पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील  विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात