ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच पदि दिपाली नरेश पाटील ,उप सरपंच राजेश शिवराम पाटील विराजमान,शेकडो कार्यकर्ते यांनी दिल्या शुभेच्छा

 ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच पदि दिपाली नरेश पाटील ,उप सरपंच  राजेश शिवराम पाटील विराजमान,शेकडो कार्यकर्ते यांनी दिल्या शुभेच्छा







पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली  : १७ नोव्हेंबर,

                ग्रूप ग्राम पंचायत माजगांव येथे आज खेळीमेळीच्या वातावरणात  महा विकास आघाडी शिवसेना ठाकरे गट) ,थेट सरपंच दिपाली पाटील यांस शिवसेनेचे नेते आत्माराम पाटील यांच्या उपस्थित पदभार स्विकारला, तर उप सरपंच राजेश शिवराम पाटील यांनी पदभार स्विकारला यावेळी शेकडो,ग्रामस्थ चाहत्यांनी पुष्प गुच्छ,हार देण्यासाठी गर्दि केल्यांचे पहावयांस मिळाले, यावेळी चाहत्यांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.थेट जनतेतून सरपंच निवडून आल्यामुळे या ठिकाणी यात्रेसारखे प्रचंड स्वरूप प्राप्त झाले होते.फटाक्याच्या अतिषबाजी आणी घोष वाक्यांनी हा परिसर गर्जून गेला होता.                                         


        दुपारी दोन वाजता या परिसरातील नागरिक बहुसंख्येने जमा झाले होते.ग्रूप ग्राम पंचायतीचा पद भार स्विकारणार या उद्देशाने शेकडो कार्यकर्ते या ग्रूप ग्राम पंचायत येथे दाखल झाले होते.राजेश पाटील यांनी या अगोदर उप सरपंच पद हे भुषविले होते,शिवाय त्यांस अनुभव खूप असल्यामुळे उप सरपंच पद मिळाले आहे.नुकताच झालेल्या थेट जनतेच्या निवडणूकीत सद्स्य आणी सरपंच यांनी आपला विजय खेचून घेवून एक प्रकारचा इतिहास रचला गेला.शिवाय जनतेनी एक जबाबदार व्यक्तींला या पदावर बसविण्याचा मान दिला.यावेळी सदस्या -अर्पणा यशवंत शिंदे, प्रांजळ प्रदिप जाधव, वैशाली नितिन महाब्दि,वंदना सुधाकर महाब्दि,सरिता कमलाकर वाघे,पुनम प्रकाश जाधव, सदस्य - शशिकांत गजानन पाटील,मधुकर गायकवाड       

     
                           यांच्या माध्यमातून आणी कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून खेळीमेळीच्या वातावरणात हा सरपंच,उप सरपंच,सद्स्य यांचा पदभार सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.यावेळी शिवसेनेचे नेते - आत्माराम पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर उपसभापती-धनाजी पाटील,यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर सभापती - जयवंत पाटील,राष्ट्रवादी नेते - सुरेश पाटील,ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सदस्य - नंदकुमार पाटील, विभागप्रमुख - नेते राजेश ढवालकर   सदस्य - कालुराम लभडे ,अनंत लभडे,हरिभाऊ लभडे, बबन शिंदे ,वामन शिंदे, सीताराम लभडे, मंगेश लभडे, शिवाजी शिंदे,रमेश जाधव,संदेश जाधव,प्रदीप जाधव,वसंत पाटील, कालुराम पाटील,आत्माराम काठवले,सूर्याजी पाटील, सुरेश महाब्दी ,सुधाकर महाब्दी, पितांबर महाब्दी, मंगेश पाटील, चंद्रकांत जाधव, संदिप जाधव, भरत पाटील, गोपीनाथ पाटील, शेकाप नेते चंद्रकांत पाटील,विलास कांबळे,आर पी आय नेते अविनाश कांबळे ,देवराम कांबळे, तसेच राष्ट्रवादी चे रणधीर पाटील, मॅचिंद्र पाटील, दिलीप काठवले, मनसे चे नितीन महाब्दी,तसेच जयेश पाटील,कृष्णा पाटील, रविंद्र पाटील, मारुती ढवाळकर, किरण पाटील, वसंत कांबळे,बाजीराव ढवाळकर,यनाजी पाटील,अमोल पाटील,संदीप जाधव,सुनिल जाधव,रमेश लभडे,गजानन जाधव,सीआरपी - कमल जाधव,तसेच महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होत्या 



चौकट : नुकताच झालेल्या निवडणूकीत मला  उप सरपंच पदाचा पदभार स्विकारण्यांची संधी मिळाल्यामुळे मी सरपंच सह सदस्यांचे तसेच माझ्या मी सर्व मतदार बंधू भगीणी यांचे आभार मानतो ( उप सरपंच  - राजेश पाटील  )

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार