"श्री समर्थ समजिक संस्था रासायनी व बिर्ला कार्बन इंडिया लिमटेड अंतर्गतजागतिक एड्स दिना निमित्त जनजागृती."
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
मोहपाडा : २ डिसेंबर
"१ डिसेंबर जागतिक एड्स दिना निमित्त श्री समर्थ सामाजिक संस्थे अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबविन्यात येत आहेत यामधे विद्यार्थी पद रॅली व परिसरातील शाळेमध्ये शिक्षण घेत असलेले ९ वी ते १२ वी मधील किशोरवयीन विद्यार्थ्यांना व्याख्याना मार्फत एड्स- बद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे.दरवर्षी परिसरातील गावांनमधे पथनाट्य या माध्यममाद्वारे जागृति करण्यात येत आहे,यावेळी जास्तीत जास्त किशोरवयींन मुलांना जागृत करण्याचा संस्थेचा मानस आहे.
आज डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय वाशिवली येथील जूनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनची पदरैली काढण्यात आली,विद्यार्थ्यांना एड्स आजारा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले,यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी किशोर वयीन होणारे शारीरिक ,मानसिक बदल यावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधुन एड्स आजारा बद्दल ची संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.परिसरातील सर्व शाळानमधे ही जागृति करण्यात करण्यात आली.
पथनाट्य या माध्यमाद्वारे तळवली,लोहोप,माजगांव,बिर्लाकार् बन,सिद्धेश्वरी,IVRCLट्रकपार्किं ग, मोहोपाडा,वावेघर,कष्टकरी नगर या ठिकाणी जनजागृती करुण माहिती पत्रके वाटन्यात आले,
0 Comments